मनपा निवडणुकीसाठी युवा पिढी सज्ज

मनपा निवडणुकीसाठी युवा पिढी सज्ज

लोकप्रतिनिधींकडून जोरदार तयारी

नाशिक । फारूख पठाण Nashik

विविध प्रकारच्या निवडणुका Elections येतात व जातात तर निवडणुकांचा अनुभव हे वर्षानुवर्षे आठवणीत राहतो. तसेच दर निवडणुकीच्या वेळी नवीन चेहरे समोर येतात, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी NMC Elections देखील अनेक तरुण तसेच नव्या पिढीतील नेते Young generation मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे. यामध्ये अनेक नावे चर्चेत आहे. राजकारणाची सुरुवात म्हणून स्थानिक पातळीवरील शहरी भागात महापालिकेची निवडणूक ही मोलाची मानली जाते, यामुळे शहरातील अनेक मोठ्या नेत्यांचे मुले किंवा मुली आता आगामी महापालिका निवडणुकीच्या मैदानात दिसणार आहे.

नाशिक महापालिकेत यंदा 11 नगरसेवकांच्या संख्येची वाढ झाली आहे. 2017 झाली झालेल्या महापालिका निवडणुकीत 122 नगरसेवक निवडून गेले होते तर यंदा 133 नगरसेवक महापालिकेत निवडून जाणार आहे. यामुळे अधिक लोकांना संधी मिळणार आहे. सध्या महापालिका निवडणुकीची तयारी विविध राजकीय पक्षांच्या वतीने विविध पातळीवर सुरू आहे.

गल्लीबोळात लहान -मोठे नेते निवडणुकीची तयारीला लागले आहेत, मात्र जनता जनार्दन कोणाला संधी देऊन सभागृहात पाठवणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. तरीही जो-तो आपल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचून आपली दावेदारी सादर करीत आहे. तसं पाहिले गेले तर प्रत्येक क्षेत्रात वेळोवेळी नवीन पिढी येत राहते, यामध्ये व्यापारी प्रतिष्ठान असो की आरोग्य सर्व क्षेत्रात कालांतराने दुसरी पिढी नव्या दमाची येऊन काम करते.

याच पद्धतीने राजकारणातही कालांतराने नवीन पिढी समोर येते. यंदाही नाशिक शहरातील विविध पक्षांचे मोठी नेत्यांची दुसरी पिढी निवडणुकीच्या तयारीसाठी लागली आहे. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार शिवसेना नेते वसंत गीते यांचे चिरंजीव प्रथमेश गीते यांनी राजकारणाची सुरुवात केली होती. ते प्रभाग 15 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडून आले तर पहिल्याच वेळी त्यांना उपमहापौरपदाची देखील संधी मिळाली, याच पद्धतीने इतर काही तरुण नगरसेवक या काळात आले आहे. तर 2022 मध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी देखील अनेक नवीन चेहरे, तरुण पिढी व नेत्यांची मुले-मुली यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

नाशिक महापालिकेची स्थापना 1982 झाली तर 1992 साली प्रथम निवडणूक घेण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत जुने नवीन चेहर्‍यांचा समावेश दिसून आला आहे. प्रत्येक निवडणुकीत जुन्यांसह नवीन चेहरे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. तर यंदाही अनेक नेत्यांची दुसरी पिढी मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.

यामध्ये प्रामुख्याने माजी महापौर विनायक पांडे यांचे चिरंजीव ऋतुराज पांडे, माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश करणारे प्रेम पाटील, ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील, नाशिक महानगर शिवसेना अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर, ज्येष्ठ नेते शिवाजी गांगुर्डे यांचे चिरंजीव रवींद्र गांगुर्डे त्याचप्रमाणे विद्यमान महापौर तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या कुलकर्णी तसेच मुलगा वैभव कुलकर्णी यांच्यासह इतरही काही वरिष्ठ नेत्यांचे दुसरी पिढी महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे. अनेक ठिकाणी याबाबत उत्सुकता देखील वाढली आहे.

स्टार प्रचारकदेखील तरुणच

नाशिक महानगरपालिका निवडणूक विविध कारणांनी आतापासूनच चर्चेत आली आहे. यामध्ये स्थानिक नेत्यांच्या पुढची पिढीची चर्चा सुरू आहेतच तर दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांची देखील दुसरी पिढी स्टार प्रचारक म्हणून नाशिकमध्ये कमान सांभाळणार आहे. यामध्ये प्रामुख्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचे नाव येत आहे. अमित यांनी मागील दोन वर्षात अनेकवेळा नाशिक मध्ये येऊन निवडणुकीबाबत तयारीला वेग दिला आहे. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवार आदी युवा नेते प्रचारासाठी येणार असल्यामुळे यंदाची निवडणूक हे युवकांच्या हाती राहणार असल्याचे चित्र रंगत आहे .

Related Stories

No stories found.