धक्कादायक! ऑडिओ व्हायरल करत तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

धक्कादायक! ऑडिओ व्हायरल करत तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) एक तरुण शेतकऱ्याने (Farmer) बँकेच्या कर्जाला (Loan) कंटाळत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे येथील संदीप राजेंद्र भुसाळ (Sandip Rajendra Bhusal) या तरुण शेतकऱ्याने एका बँकेतून कर्ज घेतले होते.

घेतलेले कर्ज फेडणे अशक्य होऊ लागल्याने नजीकच्या काळात बँकेचा तगादा लागू शकतो. ते आपण फेडू शकत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या तरुण शेतकऱ्याने याबाबतची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रसिद्ध करून आत्महत्या केली. यात त्याने कोणीही दोषी नसल्याचे नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.