विमान प्रवासासाठी 'इतके' तास आधी पोहचावे लागणार विमानतळावर

विमान प्रवासासाठी 'इतके' तास आधी पोहचावे लागणार विमानतळावर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मुंबई विमानतळावर लवकर पोहचण्यासाठी प्रशासनाने वेळेच्या मर्यादा लावल्या असून त्या माध्यमातून विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेच्या तपासणीची गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात असल्याचे वृत्त आहे.

प्रवाशांच्या गर्दीच्या काळामध्ये एकत्रित गर्दी होत असल्याने सुरक्षा तपासणीमध्ये वेळ लागत असतो परिणामी विमानाच्या वेळा बदलाव्या लागत असल्याने प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या पूर्वी साडेतीन तास अगोदर विमानतळावर पोहोचवायचे आहे तर देशांतर्गत प्रवास करताना ही वेळ अडीच तासाची ठेवण्यात आली आहे जेणेकरून आपल्या सुरक्षा तपासणी प्रक्रिया पूर्ण करून गर्दी टाळणे शक्य होणार आहे.

विमान प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने याबाबत सूचना जारी केल्या आहेत. विमानळांवर होणारी गर्दी, हवाई वाहतुकीची गर्दी यांचा हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आढावा घेतला. त्यानंतर याबाबतच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

देशातील सर्व प्रमुख विमानतळांवरील सुरक्षा तपासणीच्या क्षमतेनुसार महत्त्वाच्या उड्डाणकाळांचे नियोजन करणारा आराखडा तयार करण्याच्या सूचना शिंदे यांनी या बैठकीत दिल्या. तसेच सामानाची तपासणी करणाऱ्या मशिनबाबतही आढावा घेण्यास सांगितले.

उत्सवकाळामुळे आधीच मुंबईतील विमानतळांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. येणाऱ्या आठवड्यांमध्ये ही संख्या अधिकच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवावा, असे निर्देश देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com