
दिल्ली | Delhi
जपानमध्ये होत असलेल्या G-7 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे यावेळी सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले आहेत. त्याची लोकप्रियता 78 टक्के इतकी आहे.
त्यांची ही लोकप्रियता पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन ( US President Joe Biden) भलतेच खुश झाले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे थेट ऑटोग्राफची मागणी केली आहे. इतकेच नव्हे त्यांनी सर्वांचे मनं जिंकणारे विधानदेखील केलं आहे.
जो बायडन मोदींच्या जवळ आले आणि म्हणाले की, “मी सध्या एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना करतोय. तुमची लोकप्रियता अफाट आहे. ही माझ्यासाठी एक समस्या बनली आहे. तसेच, तुम्ही अमेरिकन लोकांवरही प्रभाव टाकला आहे. तुमची अमेरिकेत प्रचंड लोकप्रियता आहे. तुम्ही प्लीज मला तुमचा ऑटोग्राफ द्या, असं बायडन म्हणाले.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि समृद्धी आणण्यासाठी G-7 शिखर परिषद हे एक महत्तवाचं व्यासपीठ आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, इंडो -पॅसिफिक क्षेत्राचं यश आणि सुरक्षा संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे. यासाठीच G-7 महत्त्वाचं ठरणार आहे.