Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश...तर तुम्हाला टोल भरावा लागणार नाही

…तर तुम्हाला टोल भरावा लागणार नाही

नवी दिल्ली

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) नव्या गाईडलाईन्सनुसार काढल्या आहेत. त्यानुसार तुम्हाला टोल न भरताही जात येणार आहे.

- Advertisement -

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रीय महामार्गावर अनेक नाक्यांवर भल्या मोठ्या रांगा असतात. आता त्यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नव्या मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत. आता राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोल नाक्यावर १०० मीटरपेक्षा जास्त रांग असेल तर टोल माफ होणार आहे. तसेच टोल नाक्यावर केवळ १० सेकंद थांबता येणार आहे. देशभरातील टोल प्लाझावर रहदारीच्या वेळांत वाहनांना कमीत कमी प्रतीक्षा करावी लागेल, यासाठी NHAI ने हे निर्देश जारी केले आहेत.

पिवळी रेषेनंतर टोल माफ

नव्या नियमांनुसार प्रत्येक टोल नाक्यांवर १०० मीटरचे अंतर दर्शवण्यासाठी एक पिवळी रेषा आखली जाईल. त्याबाहेरील वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे. टोल प्लाझावर ऑपरेटर्सची जबाबदारी निश्चित करण्यासाठी ही व्यवस्था अंमलात आणली जात असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. एनएचएआयने दिलेल्या माहितीनुसार, फास्टॅग अंमलात आणल्यानंतर फेब्रुवारी २०२१ पासून १०० टक्के कॅशलेस टोल वसूल करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल आकारला जात आहे. इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीच्या पार्श्वभूमीवर देशात येत्या १० वर्षांत उत्तम टोल वसुली प्रणाली तयार करण्याचा निश्चय प्रशासनाने केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या