मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण

दिल्ली | Delhi

देशात प्रचंड वेगाने होत असलेल्या करोना संक्रमणामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

करोना संकटाने देशात हाहाकार उडवलेला असताना आता उत्तरप्रदेश मधून मोठी बातमी समोर येत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे.

दरम्यान, योगींच्या कार्यालयातील अनेक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला होता. तशी माहिती योगी यांनी ट्वीट करुन दिली होती. त्यांनी म्हटलं होत की, 'माझ्या कार्यालयातील काही अधिकारी करोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे अधिकारी माझ्या संपर्कात होते. खबरदारी म्हणून मी स्वत: विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्व बैठका या व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे करण्यात येतील', असं ट्वीट योगी आदित्यनाथ यांनी केलं होत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com