जागतिक योगदिन विेशेष : योगामुळे योगशिक्षकांना विदेशात नोकरीच्या संधी

जागतिक योगदिन विेशेष : योगामुळे योगशिक्षकांना विदेशात नोकरीच्या संधी

ाशिक । नरेंद्र जोशी Nashik

योगाचा उगम भारतात झाला. त्याला सांंस्कृतिक वारसा लाभला. आता जगभरात योगाची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे योग शिक्षकांना आता देश- परदेशातही नोकरीच्या चांगल्या संंधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

आज जागतिक योगदिन. गेल्या नऊ वर्षांपूर्वी या दिनाला मान्यता मिळाली. तेव्हापासून दरवर्षी 21 जूनला योगोत्सव साजरा होऊ लागला. त्यानिमित्ताने नाशिकमधील योगाची स्थिती जा़णून घेत असताना वरील चित्र समोर आले आहे. आज शहरात 20 संंस्था अतिशय चांगल्या प्रकारे योगाचा प्रचार, प्रसार करत आहेत.

योग प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र घेऊन बरेच जण विदेशात नोकर्‍या करत आहेत. आता पंचतारांंकीत हॅाटेल्समध्ये योग प्रशिक्षण आवश्यक झाला आहे. शाळा-महविद्यालयातही योग शिक्षकांच्या जागा भरल्या जात आहे. त्यामुळे रोजगाराचे नवे दालन यातून खुले झाले आहे. योगाने आपले शरीररच फक्त निरोगी राहत नाही तर योग मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरताना दिसत आहे.

एसएसवाय म्हणजे सिध्द समाधी योग (नाशिक), जगात सर्वात प्रथम स्थापन झालेल्या बिहार स्कूल आफ योग, मुंगेर ह्या विद्यापीठातून योगाचे शास्त्रशुद्ध शिक्षण व स्वामी विवेकानंद योग बँगलोर येथील योग शिक्षणाला विदेशात खूप महत्व प्राप्त झाले आहे. नाशिकचे बरेच तरुण त्यांचे प्रमाणपत्र मिळवून समाजात चांगले काम करत आहेत.

निरोगी जीवनासाठी योग ही अतिशय प्रभावी जीवन शैली आहे तसेच सामुदायिकरित्या योग केल्याने आरोग्य उत्तम राहते. तसेच सामाजिक एकोपादेखील राहतो. त्यामुळे शहरातील एकंदरीत जीवन शैलीच सुधारते. आपल्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी योग मौल्यवान आहे. प्रत्येकाने दिवसभरातील थोडा वेळ योग करण्यासाठी द्यावा.

-नंदकुमार देसाई, योगगुरु

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com