Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानवरात्रोत्सवात नाशिकच्या 'या' तालुक्यात देऊळबंदच; हे आहे कारण...

नवरात्रोत्सवात नाशिकच्या ‘या’ तालुक्यात देऊळबंदच; हे आहे कारण…

येवला | Yeola

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर येवलेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नवरात्रोत्सवात यंदाही कोटमगाव (Kotamgaon) येथील जगदंबा देऊळ बंदचा (Jagdamba Temple Kotamgaon Yeola) निर्णय येथील मंदिर ट्रस्ट व प्रशासनाने घेतला…

- Advertisement -

बाप्पा पावला; ज्यादा वाहतुकीतून एसटीला मिळाले आठ कोटी

नवरात्रोत्सवात कोटमगाव येथे लाखो भाविक येत असतात. गेल्या वर्षी करोनाचा फैलाव वाढल्याने यात्रा रद्द करून मंदिरही कुलूप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदा यात्रा भरेल, अशी भाविकांची आशा होती. मात्र यंदाही गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नवरात्रोत्सवात कोटमगाव येथील जगदंबा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय येथील मंदिर ट्रस्ट व प्रशासनाने घेतला आहे. भाविकांनी जगदंबा मातेच्या दर्शनासाठी कोटमगाव येथे येऊ नये असे आवाहन केले आहे.

७ ऑक्टोबर पासून मंदिरे व धार्मिक स्थळे उघडणार : मुख्यमंत्री

कोटमगाव बुद्रुक (Kotamgaon Budruk) येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत नवरात्रोत्सवात यावर्षीही मागील वर्षप्रमाणे भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा ठराव ट्रस्टला दिला होता. तर ट्रस्टनेही याबाबत तहसीलदारांना पत्र देऊन निर्णय घेण्याची विनंती केली होती त्यानुसार, आज तहसिल कार्यलयात तहसीलदार प्रमोद हिले यांनी बैठक बोलाविली होती.

या बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त भाऊसाहेब आदमाने, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे व स्थानिक पत्रकार हजर होते.

Video : मंदिरं उघडणार; नाशकात आनंदोत्सव

बैठकीत तहसीलदार हिले यांना मंदिर ट्रस्टने पत्र देत मुख्यमंत्र्यांनी मंदिर खुले ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला असून ग्रामपंचायतीने मंदिर बंद ठेवण्याचा केलेला ठरावानुसार हाच निर्णय योग्य असल्याचे सांगत आपल्या तालुक्यात आजही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याचे सांगितले.

आज शंभराच्या वर कोरोनारुग्ण असून नवरात्रोत्सवात मंदिर खुले ठेवल्यास भाविकांची गर्दी होऊन रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यातच कोटमगावची यात्रा ही राज्यभरात प्रसिद्ध असून याठिकाणी राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात.

Video : यात्रा बंद; मंदिर सुरु : सप्तशृंगी देवी दर्शनासाठी असे असतील नियम

मंदिर ट्रस्ट (Temple Trust) व प्रशासनाकडे नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी कुमक नसल्याने मंदिर बंद ठेवणे हाच पर्याय होऊ शकतो असे मत तहसीलदार प्रमोद हिले (Tahasildar Pramod HIle) यांनी मांडले. यावेळी कोटमगावात मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेट्स लावून नवरात्रोउत्सवात बंद ठेवण्याचे निर्देश पत्राद्वारे शहर पोलिसांना देण्याचे आदेश यावेळी नायब तहसीलदारांना दिले.

यानंतर शहर पोलीस ठाण्यातही पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या उपस्थितीत ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीतही मंदिर बंद ठेवणे यावरच सहमती सर्वांनी व्यक्त केली. बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमें, विश्वस्त भाऊसाहेब आदमाने, शरद लहरे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमें, संतोष परदेशी आदी उपस्थित होते

- Advertisment -

ताज्या बातम्या