Year ending Bad news : मुलीच्या डोळ्यात देखत वडिलांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

रामदेववाडी जवळील घटना; मुलगी गंभीर जखमी
Year ending Bad news :  मुलीच्या डोळ्यात देखत वडिलांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

लहान बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या बापाला (father) मुलीच्या (Daughter) डोळ्यासमोर भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने (truck) चिरडल्याची (crushed) दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ घडली. या अपघातात राजू दीपक कोळी (वय-45, रा. चारठाणा ता. मुक्ताईनगर) असे मयताचे नाव असून त्यांची मोठी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालायात उपचार सुरु आहेत.

मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे राजू कोळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते शेती काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. त्यांची लहान विवाहित मुलीला भेटण्याासाठी ते शनिवारी सकाळी मोठी मुलगी सोनी हिला सोबत घेवून भडगावला दुचाकीने जाण्यासाठी निघाले. रामदेववाडी गावाजवळून ते जात असतांना दुपारी साडेबारावाजेच्या सुमारास त्यांना मागून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राजू कोळी व त्यांची मुलगी हे रस्त्यावर फेकले गेल्याने ट्रकचे चाक राजू कोळी यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची मुलगी सोनी ही गंभीर जखमी झाली आहे.

वडिलांना ट्रकने चिरडतांना बघताच हरपली शुद्ध

अपघात इतका विचित्र होता की, भरधाव वेगाने जाणारा ट्रक थेट राजू कोळींच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांच्या डोक्यांचा भागाचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला होता. मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आपल्या डोळ्यासमोरच वडीलांचा मृत्यू झाल्याने मुलीची जागेवरच शुद्ध हरपून गेली होती.

रुग्णालयात कुटूंबियांचा आक्रोश

घटनेची माहिती मिळताच राजू कोळी यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी धाव घेतली. कुटुंबियांनी रुग्णालयात मनहेलावणारा आक्रोश केेला. सायंकाळी एमआयडीसी पोलिसांकडून पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ग्रामस्थांची मदतीसाठी धाव

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी स्वप्निल पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शववाहिकेतून जिल्हा रूग्णालयात पाठविले तर जखमी मुलीला खासगी रूग्णालयात हलविले. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध ठार

कुसूंबाकडून शहरात भरधाव वेगाने येणार्‍या टँकरने समोर चालत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक देवून दुचाकीस्वार मनोहर काशिनाथ पाटील (वय- 63, रा. अयोध्यानगर) या वृद्धाला चिरडल्याची घटना शुक्रवारी अजिंठा चौफुलीजवळ घडली. याप्रकरणी टँकर चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अयोध्या नगरातील मनोहर काशिनाथ पाटील हे शुक्रवारी दुपारी 4.15 ते 4.45 वाजेच्या दरम्यान कुसूंबाकडून अजिंठा चौफुलीकडे त्यांच्या दुचाकीने (एमएच.19.एक्स.8334) जात होते. अजिंठा चौफुलीवरील सातपूडा शो-रूम समोरून जात असताना अचानक त्यांना भरधाव जाणा-या (एमएच.43.वाय.8902) क्रमांकाच्या टँकरने धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना चुलत पुतण्या चंद्रकांत पाटील यांना कळाली. त्यांनी घटनास्थळी जावून गंभीर अवस्थेत पडलेले काका काशिनाथ यांना उचलून वाहनातून खाजगी रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.

उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

गंभीर दुखापत झालेले मनोहर पाटील यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर उपचार सरु असतांना रात्री 8.30 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. शनिवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात टँकर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com