राष्ट्रपती निवडणूक : यशवंत सिन्हा असणार विरोधी पक्षांचे उमेदवार

राष्ट्रपती निवडणूक : यशवंत सिन्हा असणार विरोधी पक्षांचे उमेदवार

दिल्ली | Delhi

देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदाच्या (President election) निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार असून, यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात आज विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीनंतर विरोधकांनी उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com