Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशहिजाब बंदीचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी घेतला मोठा निर्णय

हिजाब बंदीचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी घेतला मोठा निर्णय

दिल्ली | Delhi

गेल्या आठवड्यात, कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) वर्गात हिजाब (Hijab Controversy) घालण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळताना, हिजाब घालणे हा इस्लामचा (Muslim religion) अत्यावश्यक भाग नाही हे अधोरेखित केले होते. (Hijab row case)

- Advertisement -

या निकालावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (SC) धाव घेण्यात आलीय. मात्र हा निकाल देणाऱ्या त्रिसदस्यीय खंडपीठामधील सदस्य तथा कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी (Karnataka hc chief justice rituraj awasthi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी (Police) दोघांना ताब्यात घेतलं आहे. तिरुनेलवेली येथून कोवई रहमतुल्लाह, तर एस. जमाल मोहोम्मद उस्मानी या ४४ वर्षीय व्यक्तीला तंजावर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

फुटबॉल मॅचदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली; पाहा घटनेचा थरारक VIDEO

दरम्यान, या प्रकारणांनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तिन्ही न्यायमूर्तींना Y दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेशही दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या