Thursday, April 25, 2024
Homeजळगावव्वा रे, विद्यापीठाचा कारभार! MBA च्या परीक्षेत जुनीच प्रश्नपत्रिका...

व्वा रे, विद्यापीठाचा कारभार! MBA च्या परीक्षेत जुनीच प्रश्नपत्रिका…

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट् विद्यापीठाच्या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या (MBA) (Management Course Examinations) परीक्षा सुरू असून आज झालेल्या परीक्षेला जानेवारी 23 मधील जुनी प्रश्नपत्रिका (Old question paper) जशीच्या तशी विद्यार्थ्यांना (students) देण्यात आल्याने मोठा गोंधळ (confusion.) उडाला. एमबीए परीक्षेच्या निमित्ताने विद्यापीठातील परीक्षा विभागाचा (Examination Department in the University) भोंगळ कारभार (Poor management) पुन्हा एकदा समोर आला आहे.

- Advertisement -

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा परिक्षा विभाग हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. कधी उत्तरपत्रिका तर कधी तपासणीच्या विषयावरून विद्यापीठाचा कारभाराविषयी अनेकदा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराविरूध्द विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. मात्र फारशी सुधारणा त्यात झाली नाही. आता विद्यापीठाचा नवीनच प्रताप समोर आला आहे.

एमबीएच्या विद्यार्थ्यांना जुनीच प्रश्नप्रत्रिका

मे 2023 म्हणजेच सध्या एमबीए प्रथम सत्राच्या (बॅकलॉग) परीक्षा सुरू आहेत. आज ऑर्गनायझेशनल बिहॅविअर या विषयाचा 60 गुणांचा पेपर होता. या पेपरला विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांना जी प्रश्नपत्रिका देण्यात आली ती पाहून अनेक विद्यार्थी अक्षरश: बुचकळ्यात पडले. त्याला कारणही तसेच होते. मे महिन्यातील परीक्षेसाठी जानेवारी महिन्यातील जुनीच प्रश्नपत्रिका अगदी जशीच्या तशी विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आली. त्यातील प्रश्न पाहुन विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला.

काही विद्यार्थ्यांनी या विषयाची तक्रार त्यांच्या प्राचार्यांकडे केली. जानेवारी आणि मे महिन्यातील दोन्ही प्रश्नपत्रिका ह्या सारख्याच असल्याने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला.या पेपरच्या गुणांविषयी आता काय निर्णय होतो याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

परीक्षा विभाग अनभिज्ञ

विद्यापीठाकडून झालेल्या या प्रकारासंदर्भात परीक्षा विभागाशी संपर्क साधला असता एमबीएच्या या प्रश्नपत्रिकांबाबत खुद्द परीक्षा विभागच अनभिज्ञ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रश्नपत्रिकांबाबत खात्री करावी लागेल अशी माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

तांत्रिक चूकीमुळे विद्यार्थ्यांना जूनी प्रश्नपत्रिका देण्यात आली. याबाबत विद्यार्थ्यांची तक्रार आल्यास विद्यापीठ समितीपुढे सदरच्या तक्रारी ठेवल्या जातील. समिती जो निर्णय देईल त्यानुसार कार्यवाही केली जाईल. कुठल्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घेवू.

-प्रा. डॉ. दीपक दलाल, परिक्षा नियंत्रक

- Advertisment -

ताज्या बातम्या