जगातील सर्वात मोठे विमान उतरले मुंबई विमानतळावर

जगातील सर्वात मोठे विमान उतरले मुंबई विमानतळावर

मुंबई | Mumbai

जगातील सर्वात मोठे विमान (World’s Big Airoplane)'एअरबस बेलुगा' (Airbus Bulega) मंगळवारी (दि.२२) रोजी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) उतरले. त्यानंतर या विमानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत...

'एअरबस बेलुगा' विमानाचे डिझाइन व्हेल माशासारखे (Whale Fish) असून विमानाच्या कॅरिअरची लांबी ५६ मीटर आणि उंची १७ मीटर एवढी आहे. तसेच या विमानाची रेंज ४० टन वजनाला २,७७९ किलोमीटर आणि २६ टन वजनाला ४,६३२ किलोमीटर एवढी आहे. तर विमानाची इंधन क्षमता ६,३०३ यूएस गॅलन इतकी आहे. याशिवाय हे विमान १८४ फूट ३ इंच इतके लांब असून विमानासाठी फक्त दोन क्रू सदस्यांची गरज आहे.

दरम्यान, अंतराळात (Space) स्पेस शटल नेण्यासाठी सुपर गप्पी नावाचे एक महाकाय विमान १९९५ मध्ये तयार करण्यात आले होते. त्यावेळी सुपर गप्पी विमानाला पर्याय म्हणून एअरबस बुलेगा हे विमान तयार करण्यात आले. तसेच यापूर्वी जगातील सर्वात मोठे विमान म्हणून कार्गो एअरक्राफ्ट Antonov AN-225 किंवा म्रिया या नावाने ओळखले जात होते. पण रशिया-युक्रेन युद्धात ते नष्ट झाले. त्यानंतर आता विशाल आकाराचे एअरबस बुलेगा हेच विमान आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com