जागतिक आत्महत्या प्रतिबंधदिन विशेष – भारतात दर तासाला ‘इतक्या’ जणांची आत्महत्या

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जगात दरवर्षी 8 लाख आत्महत्या suicides होतात, म्हणजेच प्रत्येक 40 सेकंंदाला जगात कोणीतरी आयुष्य संपवते आहे. भारतात दर तासाला 16 जण आत्महत्या करून जगाचा निरोप घेत आहेत. आत्महत्या ही एक मोठी सामाजिक समस्या असून आत्महत्या प्रतिबंध Suicide Prevention ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

आत्महत्या ही एक जागतिक समस्या असून दिवसेंदिवस त्यात वाढ होताना दिसत आहे. या समस्येकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना 10 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळते. त्या निमित्ताने आढावा घेतला असता वरील बाब समोर आली आहे.

भारतीय आकडेवारी नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो दरवर्षी जाहीर करते. त्या नुसार वर्ष 2019 मध्ये 1,39,123, प्रत्येक दिवशी 381, प्रत्येक तासाला 16 आत्महत्या झाल्या आहेत. यात पुरुष 70%, स्त्रिया 30% आहेत. विद्यार्थी आत्महत्या- 2016 मध्ये 9,478, 2019 मध्ये 10,339 व दररोज 28 विद्यार्थी.

15 ते 30 आणि 15 ते 39 वयोगटातील मृत्यूचे प्रमुख कारण आत्महत्या होते. आत्महत्या करणारा टोकाचा निर्णय अशा वेळ घेतो की त्याला नैराश्य/उदासीनता, व्यसनाधीनता, तीव्र मानसिक आजार जसे स्किझोफ्रेनिया पर्सनॅालिटी डिसऑर्डरसारखे आजार बळावतात.

आत्महत्येसाठी आजही गळफासाला जास्त महत्त्व दिले जाते. गळफास 53%, विषप्राशन 26%, बुडून 5% मृत्यू होतात. त्यात विवाहित 67% , अविवाहित 23% इतर 10% असतात.

आत्महत्येचा प्रयत्न 20 पट जास्त लोक करतात

भारतात जवळपास 28 लाख लोक दरवर्षी आत्महत्येचा प्रयत्न करतात.

देशात प्रत्येक एक लाख लोकसंख्येत 10.4 टक्के आत्महत्या होतात.

हेच प्रमाण महाराष्ट्रात 15.4 टक्के इतके आहे.

नाशिकमध्ये हे प्रमाण 12.5 टक्के आहे. म्हणजे 60 लाख लोकसंख्या असेल तर 750 आत्महत्या दरवर्षी नाशिक जिल्ह्यात होतात. याच्या 20 पट म्हणजे 15000 लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. म्हणून आत्महत्या ही एक मोठी सामाजिक समस्या असून आत्महत्या प्रतिबंध ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *