जागतिक टपालदिन विशेष : टपालसेवेची वाटचाल ‘डिजिटल इंडिया’कडे

जागतिक टपालदिन विशेष : टपालसेवेची वाटचाल ‘डिजिटल इंडिया’कडे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सुरुवातीला केवळ कंंपनीच्या टपालाचीच ने-आण करणारी भारतीय टपाल सेवा Indian Postal Services चार शतकाच्या अथक परिश्रमानंतर डिजिटल इंडिया Digital Indiaया अभियानांतर्गत बँंकांमध्ये रूपांतरीत होऊ लागली आहे. आज 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने टपाल सेवेचे बदललेले देखणे रुप सर्वांनाच अचिंंबत करत आहे.

भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्टस अ‍ॅन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रँड नावाने चालविली जाते.देशात एक लाख 55 हजार 333 टपाल कार्यालयामार्फत इंडिया पोस्टचा कारभार देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोेचला आहे.सुरवातील पत्र, आंतरदेशीय पत्र, तार अत्यंत दुर्गम भागातही पोहोचवणा़र्‍या या टपाल सेवेच्या जाळ्यामार्फतनंतर अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही सुरू झाल्या.

आता तर आधार कार्डमध्ये बदल करणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवनज्योत विमा, अटल पेन्शन, ग्रामीण टपाल जीवन विमा, टपाल जीवन विमा, सुकन्या समृद्धी योजना, माय स्टॅम्प अशा डझनभर योजना सुरु झाल्या आहेत. तरीही 50पैशांचे पोर्स्ट कार्ड घरपोच पोचवणारे पोस्टमन आपली सेवा इमाने इतबारे करत आहेत. लाच प्रतिबंध विभागाला येथे कारवाई करण्याची वेळ कधीही आली नाही. हे पोस्टाचे आणि प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्याचे द्योतक आहे.

धातूचे टोकन ते तिकिटे

टपाल व्यवस्थेची सुरवात सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली.1688मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. सन 1774 मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आणि टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने टपालासोबत वापरायला सुरूवात झाली. सुरवातीच्या काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सीं अंतर्गतची टपाल सेवा एकसूत्री असावी असा विचार पुढे आला.

त्यातूनच पहिला भारतीय टपाल कायदा, 1837 हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून 1854चा टपाल कायदा अस्तित्वात आला. त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला. 2011पर्यंत त्यात बदल झाला नाही. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूचे टोकन मागे पडून 1 ऑक्टोबर 1854 पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकिटे वापरात आली.आता पोस्टाच्या तिकीटावर आपला फोटो असावा असे कोणाला वाटले तर तीही सोय पोस्टाने माय स्टॅम्पच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे.

Related Stories

No stories found.