जागतिक लोकसंख्या दिन : कुटुंब कल्याणात आदिवासी बांधवांची आघाडी

नाशिक जिल्हा राज्यात अव्वलस्थानी
जागतिक लोकसंख्या दिन : कुटुंब कल्याणात आदिवासी बांधवांची आघाडी
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

लोकसंंख्या नियंत्रणासाठी ( Population Control ) उच्चभ्रू व उच्चशिक्षीत समाज महिलांंच्या कुटुंंब कल्याण शस्रक्रिया करत असले तरी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांंधव मात्र स्वतः पुढे येऊन नसबंंदी करुन घेत आहेत. विशेष म्हणजे नाशिक त्याबाबत राज्यात अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज (दि.11) जागतिक लोकसंख्या दिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने जिल्ह्यात लोकसंंख्या नियंंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांंचा आढावा घेतला असता वरील बाब प्रकर्षाने समोर आली आहे. पेठ, सुरगाणा व त्रंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक पुरुषांंंच्याच शस्रक्रिया होत आहेत.

येथे आदिवासी महिलांना पुढे केले जात नाही. इतर तालुक्यात मात्र महिलांंच्या कुटुंब कल्याण शस्रक्रिया केल्या जातात. गर्भनिरोधक गोळ्या देणे, तांबी बसविणे, आता पीपीयूसीयूडी या पध्दतीचे तांंबी सदृष्य नवीन शस्रक्रिया महिलांंंवर केली जाते. ज्या महिलेला दोन अपत्य झाली आहे. तिचे समुपदेश करुन ही शस्रक्रिया केली जाते. त्यामुळे दहा वर्ष पुन्हा अपत्य होण्याची भिती नसते. इतर कोणताहीे त्रास होत नाही.

तर लगाम लागू शकतो

संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिलनेे 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. यानुसार 1989 पासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षी लोकसंख्या दिनी एक थिम ठेवली जाते. यंदाची थीम कुटुंब नियोजन आणि स्त्री-पुरूष समानतेचे सूत्र अंगीकारणे अशी आहे. मुलगाच हवा या मानसिकतेतून जग हळूहळू बाहेर पडत आहे. मुला-मुलींच्या विवाहाचे वय देखील वाढताना दिसत आहे. याचा परिणाम नक्कीच भविष्यातील लोकसंख्यावाढीला लगाम लावू शकतो.

कुटुंब नियोजनाचा महिलांच्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. विकसनशील देशांमध्ये बाळंतपणाच्या वेळी महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. महिलेचे वय जसे वाढत जाते तसा आणि 3-4 मुले झाल्यावर हा धोका जास्त वाढतो. कुटुंब नियोजनाद्वारे स्त्रीच्या पुनरुत्पादन चक्रात हस्तक्षेप केल्यावर स्त्रियांना मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येते, दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवता येते आणि त्यामुळे बाळंतपणातील मृत्यू, अनारोग्यता कमी होते.

आदिवासी भागात महिला प्रधानसंस्कृती आहे. शस्रक्रिया महिलेची केल्यास घरातील व शेतीची कामे रखडतील म्हणून शक्यतो पुरुष शस्रक्रियेस पुढेे येतात. गेल्या पंंधरा वर्षात आरोग्य विभागाने पुरुष नसबंदीबाबत जे गैरसमज होते ते मोठ्या प्रमाणात कमी केले. त्यामुळे आज जिल्ह्यातील आदिवासी बांधव नसबंंदीत अग्रेसर असल्याचे स्पष्ट झाले आहे .

डॉ मोतीराम पाटील , वैद्यकीय अधिकारी, नाशिक जिल्हा परिषद

* जागतिकक स्तरावर दर मिनिटाला 144 बालके जन्माला येतात.

* भारतात दर मिनिटाला 48 बालके जन्म घेतात.

* भारताची लोकसंख्या आज 137 कोटी आहे ती अशाच वाढत राहिली तर 2024 पयर्ंंत भारत चीनलाही मागे टाकण्याची शक्यता.

* 2050 पर्यंत जगाची लोकसंंंख्या दहा अब्ज होईल.

* लोकसंंख्या वाढीचा वेग दशवार्षीक 17.7 टक्के आहे.

* जागतिक स्तरावर सरासरी आयुर्मान 72 वर्ष आहे.भारतीयांंचे 69 वर्षाचे आहे.

* 2011च्या जनगणनेच्या वेळी भारताची लोकसंख्या 121 कोटी पाच लाख होती. आता जनगणना बाकी असली तरी ती 137 कोटीपर्यंत गेल्याचे सांंगीतले जात आहे. यावरुन लोकसंंख्या वाढीचा वेग लक्षात येत आहे.

* दरवर्षी एक कोटीे 20 लाखाची भर पडते. दर सेकंदाला तीन बालके जन्माला येताता. पुर्वी प्रत्येक स्रीमागे 3-4 हा मुलांचा दर होता.आता तो 2.2 झाला आहे.

* चीनने गेल्या दोन महिन्यापूर्वी हम दो हमारे दो चे धोरण बदलून हम दोन हमारे तीन असे स्विकारले आहे. भारतात हम दो हमारे दो चा नारा कायम आहे.

* जागतिक लोकसंंख्येत भारताचा वाटा 18 टक्के आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com