जागतिक छायाचित्र दिन विशेष : रोलचा कॅमेरा ते मोबाईल फोटोग्राफी
मुख्य बातम्या

जागतिक छायाचित्र दिन विशेष : रोलचा कॅमेरा ते मोबाईल फोटोग्राफी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सातपूर | प्रतिनिधी

काही वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागे. मात्र, अलीकडच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी प्रगती साधली आहे. काळानुक्रमानुसार छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेलेली बघायला मिळतात...

सुरुवातीला रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाईल… टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले…

या कलेतली हुशारी मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे. अनेक मोबाईल आले आहेत, त्यातून वेगवेगळ्या angel ची फोटोग्राफी सुरु झाली. त्यामुळे फोटोप्रती आत्मीयता अधिकची वाढलेली दिसते.

जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने नामवंत छायाचित्रकारांनी अनेक भावना व्यक्त केल्या. बघुयात काय म्हणतायेत नाशिकमधील छायाचित्रकार...

वाइल्ड फ्रॉक फोटोग्राफी हा एक छंद आहेच मात्र हे वन्यप्राण्यांच्या जीवनाचा अभ्यास करण्याचे रुक स्त्रोत आहे.

वाइल्डलाइफ फोटोग्राफी हे अतिशय संवेदनशील भाग आहे. यात फोटोग्राफरकडे आधुनिक साधने आवश्यक असतात त्यांना फोटोग्राफीचे ज्ञान गरजेचा आहे. त्यासोबतच वन्यजीवांच्या जीवनशैलीतही ज्ञान आवश्यक आहे.

तासनतास एखाद्या स्थानावर बसून फोटोग्राफी करावी लागते. सोबत केले वाईड एंगल मायक्रो लेंस बॅलेन्स असावी लागतात एखाद्या प्राण्याचे फोटो काढताना शंभर ते दोनशे फोटो काढल्यावर एखादा चांगला फोटो हाती लागतो हजारो शॉर्ट्स घ्यावे लागतात.

वन्य प्राण्यांची जीवनशैली ही माणसासारखी नाही ते माणसापासून माणसाच्या अस्तित्वाच्या खुणांपासून दूर जात असतात. त्यासाठी संवेदनशील लेन्स वापरून एका स्थानावर तासन्तास डेरा टाकावा लागतो एक तपश्चर्या आहे.

यात कोणतेही प्लॅन करून ठेवता येत नाहीत हे बस चॅलेंजिंग जॉब आहे वाइल्डलाइफ फोटोग्राफी म्हणजे स्टडी फोटोग्रफी होय. हजारो शॉट नंतर एखादा फोटो सर्वांना आवडणारा सापडतो एक तपश्चर्याच म्हणावी लागेल. त्यामुळेच फोटोग्राफी करताना आवडही तितकीच महत्त्वाची ठरते. वर्ल्ड फोटोग्राफी माणसाला वन्यप्राण्यांच्या जीवनशैलीचा वर्तनाचा अभ्यासा शिकवते

- अतुल धामणकर, वाईल्ड रीसर्चर एण्ड फोटोग्राफर

फोटोग्राफी हे एक आर्ट आहे. 'गो फॉर फायनल पिक्चर' हे त्यातलं प्रमुख सूत्र आहे. आपल्या प्रत्येक क्लिक मध्ये परफेक्शन असणे महत्त्वाचा आहे. निसर्गाकडे खूप काही आहे ते पाहण्याची दृष्टी असावी लागते. मात्र त्यात काही नियम पाळणेही गरजेचे आहे. आपण फोटोग्राफीच्या निमित्ताने निसर्गचक्रात व्यत्यय निर्माण करीत असतो. वर्ल्ड फोटोग्राफी करताना अनेक जण वन्यप्राण्यांच्या व पक्ष्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करताना दिसून येतात. याबाबत जागरूकता पाळणे गरजेचे आहे.

वाईल्डलाईफ फोटोग्राफी संयम, सहनशीलता व सहिष्णुता शिकवत असते. निसर्गाकडे खूप काही घेण्यासारखा आहे त्यामुळे जगण्याची पद्धत बदलते निसर्ग चमत्कार दाखवत असतात. मात्र त्यासाठी संयम महत्त्वाचा आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे फोटोग्राफीतील अचूकता विचलित झाल्याचे चित्र आहे. परफेक्ट शॉट व त्यासाठी करावे लागणारे परिश्रम हल्ली दिसून येत नाही. ही खंत आहे दरवर्षी आपल्या गुरूंनी शिकवलेला मार्ग व त्यांनी दिलेल्या शिकवणीचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून फोटोग्राफी करणे हेच आपलं कर्तव्य आहे असे मी मानतो

- बिभास आमोणकर नेचर फोटोग्राफर

फोटोग्राफी हा छंद म्हणून जरी जोपासला जात असला तरी त्यासाठी एक दृष्टी असणे गरजेचे आहे फोटोग्राफीमध्ये अचूक वेळ साधता येणे महत्त्वाचे आहे करोना या महामारीच्या काळात अनेक हौशी छायाचित्रकार तयार झाले.

मात्र, या काळात खर्‍या अर्थाने कॅमेऱ्याला महत्व आले संपर्क बंद असताना संवाद साधण्यासाठी वापरण्यात आलेला कॅमेरा सर्वांनाच प्रिय ठरला होता मागील दोनशे वर्षात कधी नव्हे तो सन्मान कँमेर्‍याला लाभला आहे

प्रसाद पवार, ज्येष्ठ छायाचित्रकार

समाजातील विविध घटनांचा व प्रसंगांचा आरसा म्हणून फोटोग्राफर कडे पाहिले जातात. त्यामुळे संस्मरणीय आठवणी ठेवण्यासाठी समाजात घडणाऱ्या अनिष्ट प्रवृत्तींना जगासमोर आणण्यासाठी फोटोग्राफरच महत्व वेगळा आहे.

वाईट फोटोग्राफी हा त्यातला अतिशय संयमाचा आणि समाधीचा प्रकार आहे एका फोटोसाठी अनेक वेळा अनेक तास शांतपणे बसून राहावे लागते. ही तपश्चर्या केवळ त्या क्षेत्रात काम करणारा फोटोग्राफरच करू शकतो.

या सर्व बाबींचा विचार करता हा छंद जोपासणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. फोटोग्राफर ची खरी कलाही छायाचित्र बोलकी करण आहे. या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती देशाचा सांस्कृतिक ठेवा नैसर्गिक संपदा यांची माहिती जगापुढे ठेवण्याची एक साधन आहे.

बैजू पाटील, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com