जागतिक ओझोन संरक्षण दिवस : पर्यावरणपूरक सेवांना अग्रक्रम देणे काळाची गरज

जागतिक ओझोन संरक्षण दिवस  : पर्यावरणपूरक सेवांना अग्रक्रम देणे काळाची गरज
USER

नाशिक । शुभम धांडेे Nashik

जागतिक पातळीवर वाढलेल्या प्रदूषणामुळे pollution वातावरण, हवामान, पर्यावरण आणि आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर Ozone Layer विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे सरळ पृथ्वीवर येत असल्यामुळे वृक्ष, मानव आणि सजीव सृष्टीवर विपरित परिणाम होत आहे.

यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती मोहीम राबवली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाने 16 सप्टेंबर 1987 मध्ये क्लोरोफ्युरो कार्बनची निर्मिती आणि वापर यावर नियंत्रण ठेवण्याचा करार केला. त्यानिमित्ताने 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिवस World Ozone Protection Day म्हणून जगभर साजरा केला जातो.

जागतिक स्तरावर साजरा होणार्या ओझोन दिनानिमित्त नागरिकांनी पर्यावरणपूरक सेवांना अग्रक्रम देणे काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ओझोन थराचे महत्त्व जगभरातील सामान्य जनतेला समजण्यासाठी दर वर्षी जगभरात संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे ओझोन दिनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

औद्योगिकरण, शहरीकरण, कमी होत जाणारी जंगले, बदललेले राहणीमान ही वातावरण प्रदूषणाची महत्त्वाची कारणे आहेत. पृथ्वीभोवतीचे नैसर्गिक ओझोनचे कवच सूर्यापासून निघणार्‍या अतिनील किरणांपासून सजीवांचे संरक्षण करते. मात्र, घातक वायूंच्या उत्सर्जनामुळे ओझोनचा थर कमकुवत होत आहे. अतिनील किरणांमुळे जागतिक तापमानात बदल होत आहे. बदलत्या हवामानामुळे विविध देशांतील पावसाचे तसेच उन्हाळ्याचे चित्र बदलले आहे. त्याचा परिणाम पीक उत्पादन आणि जनावरांच्या व्यवस्थापनावर दिसून येत आहे. 1985 मध्ये अंटार्क्टिकावरील ओझोनचा थर विरळ झाल्याचे तज्ज्ञांच्या लक्षात आले आणि या विषयाचे गांभीर्य जगाच्या समोर आले.

यंदाच्या ओझोन दिनाची थीम

या वर्षीच्या ‘जागतिक ओझोन दिना’ची थीम मॉन्ट्रियल प्रोटोकॉल - ‘किपींग अस, अवर फूड अँड व्हॅक्सिन कूल’ ही आहे. या वर्षीच्या जागतिक ओझोन दिनाला हायलाइट केल्याप्रमाणे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल बरेच काही करते. जसे की हवामानातील बदल कमी करणे, थंड प्रदेशात ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यास मदत करणे. ते अन्न सुरक्षेसाठी योगदान देते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्व 197 सदस्य देशांनी या प्रोटोकॉलला सार्वत्रिक मान्यता दिली आहे.

भारताचा कृती आराखडा

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 2019 च्या दरम्यान इंडिया कूलिंग अ‍ॅक्शन प्लॅन विकसित आणि लॉन्च केला आहे. जागतिक ओझोन दिन 2021 च्या संकल्पनेशी तो सुसंगत आहे. सर्व क्षेत्रात थंड होण्याच्या दिशेने एकात्मिक दृष्टी प्रदान करणे हा त्यामागचा उद्देश आहे. इमारतींमध्ये स्पेस कूलिंग आणि कोल्ड चेन आदी सर्व गोष्टींचा समावेश आहे कूलिंगची मागणी कमी करणे, रेफ्रिजरंट ट्रान्झिशन, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि 20 वर्षांच्या क्षितिजासह चांगले तंत्रज्ञान पर्याय त्यात समाविष्ट आहेत.

ओझोनचे संरक्षण आवश्यक

पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी सूर्य, जितका पोषक तितकाच तो घातकदेखील आहे. सूर्यापासून येणारी मध्यम अति-नील किरणे मानव व प्राण्यांमध्ये विविध आजार उत्पन्न करू शकतात. ओझोन थर सूर्याच्या या हानिकारक अतिनील किरणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो आणि वातावरणात संतुलन राखतो. परंतु या सुरक्षाकवचाला छिद्र पाडण्याचे काम स्वत: मानवच करीत आहे. मानवनिर्मित प्रदूषणामुळे ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी होत आहे. पर्यावरणाला ते विनाशकारी ठरू शकते. सूर्यावरील अल्ट्रा व्हायलेट किरणे थेट पृथ्वीवर पडली तर मानवाशिवाय झाडे, प्राणी आणि इतर जीव यांच्यावर त्याचा अत्यंत धोकादायक आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत ओझोन थराचे जतन करणे फार महत्त्वाचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com