Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशतैवानमध्ये ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

तैवानमध्ये ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

दिल्ली | Delhi

तैवानमध्ये ७.२ तीव्रतेच्या भूकंपाचा (Earthquake In Taiwan) जोरदार धक्का बसला. आग्नेय किनारपट्टीवरील तैतुंग शहराजवळ ७ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाच्या धक्क्यात अनेक लोक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

तैवानमध्ये गेल्या २४ तासात तीन वेळा भूकंप आला आहे. भूकंपामुळे तैवानमधील अनेक रस्त्यांना तडे गेले आहेत, पूल कोसळले आहेत. पूल कोसळले असल्याने काही वाहनंदेखील खाली कोसळल्याची माहिती मिळत आहे. युएस पॅसिफिर त्सुनामी वॉर्निग सेंटरने, या भूकंपानंतर तैवानामध्ये त्सुनामी अलर्ट जारी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या