Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याप्रत्येक दिवस हवा 'मातृदिन'

प्रत्येक दिवस हवा ‘मातृदिन’

नाशिक | ज्ञानेश्वर जाधव Nashik

आईचे मातृत्व साजरा करण्यास केवळ एक दिवस पुरेसा नाही आईवर ( Mother )प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आपण प्रत्येक दिवस मदर्स डे ( Mothers Day) म्हणून खास बनवला तरी कमीच आहे. आपल्या आईला कधीही दुःखी होऊ न देणे, कधीही तिचा अनादर न करणे, आपल्या आईची काळजी घेणे हे प्रत्येक मुलांचे कर्तव्य आहे. आईला तिच्या मुलांचे प्रेम आणि आदर मिळणे यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी भेट तिच्यासाठी असू शकत नाही.

- Advertisement -

लहानपणी शाळेत ‘माझी आई’ या विषयावर निबंध लिहून आणायला सांगायचे. अगदीच लहानसहान मुलांना त्या वेळीच आईचे महत्त्व या विषयी आपले मत व्यक्त करता येत असेल. सांगायचे हे आहे की लहानपणापासूनच आई नावाची महती कळायला सुरुवात होते. मदर्स डे प्रत्येकासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे.

आईची ममता आणि प्रेमाला मूल्य नाही. एक आई आपलं मूल गर्भात वाढवण्यापासून ते आपल्या जिवंत राहण्यापर्यंत काळजी घेत असते. आई हीच आपल्या मुलांची पहिली शिक्षिका आणि पहिली मैत्रीण असते. लेकरांच्या हालचालीवरून त्याला काय हवे आहे हे जाणून घेणारी एक आईच असते. आई आपल्या मुलांवर नि:स्वार्थ प्रेम करते. आणि जीवनात योग्य मार्ग दाखवते. आपल्या मातांचे आभार मानण्यासाठी, त्यांच्याप्रती आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण मातृदिन साजरा करतो.

अनेक शाळांमध्ये मदर्स डे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी मुलांच्या आईला शाळेत आमंत्रित केले जाते. या दिवशी काही मुले त्यांच्या मातांसाठी निबंध लिहितात, त्यांच्यासाठी भाषणे करतात. काहीमुले त्यांच्या आईसाठी कार्ड तयार करतात, काही गाणी गातात, तर काही त्यांच्या आईला त्यांच्या आवडत्या वस्तू मिळवून देतात.

आपल्या मुलांचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व घडवणारी आई असते. सर्व माता आपल्या मुलांना वाढवतात आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. ती तिच्या मुलाला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेते. आई ही तिच्या मुलांची पहिली गुरू असते. प्रत्येक गोष्टीत ती तिच्या मुलांच्या पाठीशी उभी राहते आणि त्यांना जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करते. ही एक आईच चुकीच्या गोष्टींपासून आणि ते चुकीचे वागण्यापासून रोखते.

मुले चुकीच्या रस्त्याने जाताना ती त्यांना खडसावते आणि त्यांना योग्य मार्ग दाखवते, म्हणूनच आई ही कोणत्याही मुलाची गुरू म्हणून ओळखली जाते. आईसाठी तिचे संपूर्ण जग तिच्या मुलांभोवती फिरते. आई नेहमीच आपल्या मुलांना प्रेरणा देते, त्यांना पुढे जाण्यासाठी आणि जीवनात कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करते.

ती मुलांच्या इच्छा पूर्ण करताना आपल्या इच्छा विसरते. ती मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून खायला घालते, ती तिच्या मुलांना नवीन गोष्टी सांगते. आई आणि मुलाचे नाते खूप खास असते. आईला एका दिवसापुरते महत्व देण्याइतके तिचे कर्तृत्व नक्कीच नाही. आईचे मातृत्व साजरा करण्यास केवळ एक दिवस पुरेसा नाही आईवर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आपण प्रत्येक दिवस मदर्स डे म्हणून खास बनवला तरी कमीच आहे.

आपल्या आईला कधीही दुःखी होऊ न देणे, कधीही तिचा अनादर न करणे, आपल्या आईची काळजी घेणे हे प्रत्येक मुलांचे कर्तव्य आहे. आईला तिच्या मुलांचे प्रेम आणि आदर मिळणे, यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी भेट तिच्यासाठी असू शकत नाही.

कशी झाली ‘मदर्स डे’ साजरा करण्याची सुरुवात?

‘मदर्स डे’ साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेतून झाली होती. अमेरिकन एक्टिविस्ट एना जार्विस यांचे आपल्या आईवर खूप प्रेम होते. त्यांनी स्वतः लग्न केले नाही. कालांतराने त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आईवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनीच या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये ’मदर्स डे’ साजरा करण्यात येऊ लागला.

- Advertisment -

ताज्या बातम्या