Video : आनंद स्वत:मध्येच, फक्त तो शोधता आला पाहिजे

जागतिक आनंद दिन
Video : आनंद स्वत:मध्येच, फक्त तो शोधता आला पाहिजे

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदाचे क्षण मिळविण्यासाठी अनेक लोक धडपड करत असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघ आजच्या दिवशी (दि. २० मार्च) जागतिक आनंद दिन साजरा करत असते.

या दिना निमित्त राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंतीदेवीजी, उपक्षेत्रीय संचालिका, नाशिक यांच्याशी संवाद साधला, 'शांततेसाठी लोकांमध्ये सुख व समाधानाची वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे.

आनंद स्वत:मध्येच असतो, फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे'. तसेच आजच्या करोना महामारीच्या काळात स्व:ताला स्थिर ठेवणे महत्त्वाचे आहे. जेणे करून येणाऱ्या काळात आव्हान पेलतांना सोपे होईल.

आनंद हा मानसिक असतो. तो बाह्य़ गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधा

० प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा वेगळी असते. त्याचा आदर करा.

० जीवनात येणाऱ्या लहानसहान गोष्टींतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा.

० सतत ताणाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका.

० खेळ, करमणूक, गायन, पर्यटन, नर्तन, वाचन या गोष्टींसाठी थोडा वेळ द्या.

० आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका.

० आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा, कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात.

० आयुष्यात दु:ख, त्रास होतच असतो, त्यांचं प्रमाण कमी कसे करता येईल ते शोधून पाहा. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com