
मुंबई | Mumbai
मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकर (Ashish Sakharkar) यांचे निधन झाले आहे. आशिष साखरकर हे शरीर सौष्ठव क्षेत्रातील मोठे नावाजलेले नाव आहे. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री अशा अनेक खिताबांवर आशिष साखरकर यांनी नाव कोरले आहे...
गेल्या काही दिवसांपासून आशिष साखरकर हे आजाराशी झुंज देत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. आशिष साखरकर यांनी चारवेळा मिस्टर इंडियाचा खिताब मिळवला आहे. आशिष साखरकर चारवेळा मिस्टर इंडिया, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य पदक, आशिया रौप्य पदक, युरोपियन चॅम्पियनशिप, शिवछत्रपती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांवर आणि सन्मानांवर त्यांनी आपले नाव कोरले होते.
आशिष यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्याच्या असंख्य चाहते आणि मित्रांनी श्रद्धांजली वाहिली आहे.