Sunday, April 28, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023 : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी आणि...

World Cup 2023 : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी आणि कुठे होणार सामने

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारतामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप (ICC ODI World Cup) स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. स्पर्धेमध्ये एकूण 48 सामने खेळण्यात येणार असून, स्पर्धा 45 दिवस होणार आहे.

- Advertisement -

स्पर्धेमध्ये दहा संघ सहभागी होणार आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे संघ याआधीच निश्चित झाले होते. याशिवाय उर्वरित दोन जागांसाठी झिम्बाब्वे, श्रीलंका, विंडीज या संघांपैकी दोन संघांना मुख्य फेरीमध्ये प्रवेश मिळेल असे बोलले जात होते.

यात श्रीलंका आणि झिम्बाब्वे संघांना सर्वाधिक पसंती देण्यात आली. दोन वेळेचा वर्ल्डकप विजेता विंडीज संघांची कामगिरी सूमार झाली होती. झिम्बाब्वे संघाचा पराभव करून श्रीलंका मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले. यामुळे टीम इंडियाचे वेळापत्रक निश्चित झाले आहे.

ठाकरे गटाला आणखी एक धक्का! नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

‘या’ दिवशी होणार टीम इंडियाचे सामने

०८ ऑक्टोबर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – चेन्नई

११ ऑक्टोबर अफगाणिस्तान विरुध्द भारत – दिल्ली

१५ ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान – अहमदाबाद

१९ ऑक्टोबर भारत विरुद्ध बांगलादेश -पुणे

२२ ऑक्टोबर भारत विरुद्ध न्यूझीलंड – धर्मशाला

२९ ऑक्टोबर भारत विरुद्ध इंग्लंड – लखनऊ

०२ नोव्हेंबर भारत विरुद्ध श्रीलंका – मुंबई

०५ नोव्हेंबर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – कोलकाता

११ नोव्हेंबर भारत विरुद्ध नेदरलँड – बंगळूरू

सलिल परांजपे, नाशिक.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

“माझे राजकीय करिअर संपवण्याचा डाव, सोनिया गांधी, राहुल गांधींना…”; काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी मांडली भूमिका

- Advertisment -

ताज्या बातम्या