<p>करोना जगातून हद्दपार होणार आहे. ही महामारी संपणार असे स्वप्न पाहण्यास आता हरकत नाही असे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी केले आहे...</p>.<p>कालपर्यंत लशीचा प्रभाव पडत नसल्याने चिंतीत असलेल्या या आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी आज लसीच्या प्रभावाचा अंदाज घेत जगातील जनतेला दिलासा देईल असेच वक्तव्य केले आहे.</p><p>अनेक देशांमध्ये लसींवर काम सुरु आहे. काही ठिकाणी लसी तिसऱ्या टप्प्यातही आहेत. त्यांचे परिणाम चांगले बघायला मिळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण करोना महामारी संपेल असं स्वप्न पाहण्यास हरकत नाही असे म्हटले आहे.</p><p>टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी हे व्यक्तव्य संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केलं आहे. असे असले तरीदेखील प्रगत आणि श्रीमंत देशांनी लसीच्या आशेवर गरीब आणि मागास देशांना ठेवू नये असेही त्यांनी स्पष्ट केले.</p>