Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याजागतिक रक्तदान दिन विशेष : करा रक्तदान मिळेल इतरांंना जीवदान

जागतिक रक्तदान दिन विशेष : करा रक्तदान मिळेल इतरांंना जीवदान

नाशिक । प्रतिनिधी

दानात दान रक्तदान हे आजही सर्वश्रेष्ठ आहेे. कारण एकाने केलेल्या रक्तदानाने किमान चार जणांचे प्राण वाचवता येतात. 14 जून हा रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने रक्तदानाची सद्यस्थिती, त्या विषयीचे समज-गैरसमज याचा आढावा घेतला असता सध्या मागणी एवढाच पुरवठा होत आहे. अचानक मागणी वाढल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण होत आहे. म्हणूनच त्याविषयी जागृतीची गरज आहे.

- Advertisement -

रक्तदान हे 18 ते 65 वयोगटांतील कोणतीही निरोगी व्यक्ती करू शकते. मनुष्य वर्षातून चारदा रक्तदान करू शकतो. एकदा रक्त दिल्यानंंंतर साधारण तीन महिनेे रक्त घेतले जात नाहीे. सर्वसाधारण 45 किलो वजन असणार्‍या व्यक्तीच्या शरीरातील एकावेळी साडेतीनशे मिली रक्त घेतले जाते. शरीरातील पाच लिटर रक्तापैकी साडेतीनशे मिली रक्त घेतल्याने फारसा फरक पडत नाही.

उलट नवीन रक्त निर्मितीला चालना मिळते. संंंपूर्ण आुयष्यात एक व्यक्ती 168वेळा रक्तदान करू शकतो. रक्त घेण्याची वेळ सहसा येऊ नये असे कितीही वाटत असले तरी प्रसूतीच्या वेळी महिलांंना, अपघातग्रस्त, थॅलेसेमीया, सिकलसेल रुग्णांंना, एखादी शस्रक्रिया करताना, नवजात बालकांंना तातडीची रक्ताची गरज भासते, त्यामुळे केलेले रक्तदान कधीही समाजोपयोगीच असते.

यांनी रक्तदान करू नये

कर्करुग्ण, उच्च रक्तदाब असणारे, मधुमेही, हृदयरुग्ण, मद्यपी, दुर्धर आजारी, एचआयव्हीग्रस्त, तंबाखू, गुटखा खाणारे रक्तदान करू शकत नाही. रक्तदान करताना आजारी असल्यास रक्तदान करू नये.

वर्षातून एकदा रक्तदान करा

रक्ताची गरज केव्हाही कोणालाही भासू शकते. त्यामुळे ठराविक लोकांवरच रक्तदानासाठी अवलंंबून राहण्यापेक्षा प्रत्येक निरोगी व्यक्तीने आपल्या वाढदिवसानिमित्त वर्षातून एकदा रक्तदान केले तरी देशातील रक्ताची टंचाई दूर होऊन प्रत्येकाला वेळच्या वेळी रक्त मिळू शकेल.

नाशिकमध्ये रोज 200 पिशव्या रक्ताची गरज असते. सध्या नाशिकमध्ये रक्तपेढ्या वाढल्याने ती गरज भागवीेणे शक्य झाले आहे. मात्र जेवढी गरज तवढेच रक्त उपलब्ध होते. म्हणून शहरातील 2 टक्के नागरिकांनी जरी नियमित रक्तदान केले तरीसुद्धा हा प्रश्न सुटू शकेल.

संंजय कुलकर्णी, तंंत्रज्ञ व्यवस्थापक (जनकल्याण रक्तपेढी)

गेल्या दीड वर्षापासून करोनामुळे हॉस्पिटलमधील इतर शस्रक्रिया बंंद आहेत. आता मात्र अनलॉक नंतर रुग्णालये जेव्हा पूर्ण क्षमतेनेे चालू होतील, तेव्हा मात्र शस्रक्रियांंसाठी गर्दी वाढेल. त्यावेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासू शकेल. त्यामुळे सध्याचा रक्तपुरवठा पुरेसा ठरणार नाही. त्यामुळे तरुणांनी आता रक्तदानासाठी सक्रीय होणे गरजेचे आहे.

डॉ. वैशाली काळे, अर्पण रक्तपेढी

- Advertisment -

ताज्या बातम्या