Video : शिक्षण, संशोधन आणि आरोग्य या त्रिसूत्रीचा वापर करून प्रगती करणार

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू ले.जनरल डॉ. माधुरी कानिटकर
Video : शिक्षण, संशोधन आणि आरोग्य या त्रिसूत्रीचा वापर करून प्रगती करणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शिक्षण, संशोधन आणि आरोग्य या त्रिसूत्रीचा वापर करून आरोग्य विज्ञान विद्यापीठाला प्रगतीपथावर नेणार, असे प्रतिपादन लेफ्ट जन डॉ माधुरी कानिटकर (Lieutenant General Madhuri Kanitkar) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मा. कुलगुरु पदाचा कार्यभार (maharashtra university of health sciences) गेल्या आठवड्यात स्वीकारल्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला....

यावेळी त्यांनी बनविलेले व्हिजन डॉक्युमेंटची माहिती दिली. (Vision Document) विद्यापीठ हे शिक्षणाचे केंद्र आहे आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. विद्यापीठात विविध विषयांवर संशोधन व उपक्रम होणे गरजेचे आहे, यासाठी विद्यापीठाचा व्हिजन डॉकुमेंट तयार करण्यात आला असून यामुळे अल्प, मध्यम अणि दिर्घ मुदतीत विद्यापीठाच्या एकूणच कामकाजाची दिशा ठरवली जाणार आहे.

करोना कालावधीत डॉक्टरांची संख्या कमी प्रमाणात असल्याचे चित्र होते. यावर उपाय म्हणून कौशल्यधारीत कमी कालावधीच्या अभ्यासक्रम तयार करत आहोत; तसेच ऍलोपॅथी (allopathy), आयुर्वेद (Ayurveda) आणि होमिओपॅथी (homeopathy) या तिन्ही पॅथीचा अभ्यास करून त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या पॅथींबाबत किमान माहिती व अभ्यास असल्यास रुग्णावर योग्य पद्धतीने उपचार होऊ शकतो. त्यामुळे विद्यापीठातर्फे भविष्यात फॅमिली मेडिसिन (Family Medicine) कोर्स सुरु करणार असून त्याद्वारे सर्व पॅथींचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळू शकेल.

माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सक्षमतेने पोहचणे शक्य होणार आहे. आरोग्य शिक्षण क्षेत्रात कोविड-19 च्या काळात आलेल्या अडचणींची पुनरावृती होऊ नये,यासाठी व्यापक प्रमाणात बदलाची गरज आहे. यासंदर्भात विषयतज्ज्ञ व त्या-त्या क्षेत्राशी निगडीत लोकांचा सल्ला आाणि मार्गदर्शनाने कार्याची वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संशोधन विद्यापीठाचे प्रमुख ध्येय असून त्या अनुषंगाने विशेष कार्य केले जाणार आहे. अंतर विद्याशाखा संशोधनावर भर दिला जाणार आहे. रुग्णाला पूर्ण बरे करण्यासाठी सर्वसमावेशक उपचार पद्धतीची आवश्यकता आहे. आणि त्यादृष्टीने विद्यार्थी घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालये यांच्यात करार करून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना प्रत्यक्ष कामाची संधी दिली जाणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येत्या वर्षात २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. India@75 या धर्तीवर MUHS@25 हा उपक्रम राबविणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

दृष्टीक्षेपात विद्यापीठ

- विद्यापीठाच्या व्हीजन डॉक्युमेंटमधील योजना- नवीन पदव्युत्तर महाविद्यालय सुरु करणे
- तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे शिक्षणातील गुणवत्ता वाढविणे.
- सर्व प्रक्रियेचे ऑटोमेशन.
- आंतर विद्याशाखा संशोधनावर भर.
- कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी मानव संसाधन आणि विद्यार्थी कल्याण उपक्रम.
- विद्यापीठ परिसराची सुधारणा-ग्रीन कॅम्पस करणे.
- विभागीय केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com