Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedएसटी महामंडळाचे मोठे पाऊल : ५५ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस

एसटी महामंडळाचे मोठे पाऊल : ५५ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस

एसटी कर्मचारी आंदोलनावर (ST Workers Strike) ठाम असताना आता महामंडळाने (MSRTC)सेवानिवृत्त/ स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जाहीरात काढली आहे. तर दुसऱ्या बाजुला कामावर न येणाऱ्या ५५ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस ( notice)पाठवली आहे.

संप पुकारल्यानंतर कामावर न आलेल्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने नोटीस पाठवून कारवाई का करू नये असं विचारलं आहे. यामध्ये सेवा समाप्ती करण्यात आलेले कर्मचारी वगळून जे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत त्यांना शिस्त आणि आवेदन कार्यपध्दतीनुसार अपराध कारवाई का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजवली आहे

- Advertisement -

गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

महामंडळाकडून जाहिरात

मागील अडीच महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू असून आता महामंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे. वेतनवाढीची घोषणा केल्यानंतरही फार कमी प्रमाणात कर्मचारी रूजू झाले. त्यामुळे एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना साद घातली आहे. महामंडळाने त्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार वय 62 वर्ष पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

करार पद्धतीने नियुक्ती

करार पद्धतीवर नेमणूक होणाऱ्या चालकांना दरमहा 26 हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. इच्छुक चालक ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले, त्या विभागांमध्ये करारपद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करू शकणार आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये अर्ज करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. इच्छुक उमेदवारावर एसटी महामंडळाच्या सेवेत असताना अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघाताची नोंद नसणे, शिक्षा म्हणून बडतर्फ किंवा सेवामुक्त केलेला नसावा अशी अटही महामंडळाने ठेवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या