Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानरेगात जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी कामाला लागा: जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल

नरेगात जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी कामाला लागा: जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

विविध योजना राबविण्यात जिल्हा आघाडीवर आहे. मात्र,दुसरीकडे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत (नरेगा) (Mahatma Gandhi Employment Guarantee Scheme) पिछाडीवर आहे. हे अयोग्य (health) आहे.

- Advertisement -

नरेगात नाशिक जिल्हा (nashik district) प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी कामाला लागा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Ashima Mittal) यांनी गटविकास अधिकाºयांना समन्वय सभेतत दिले.

मित्तल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर तालुका दौरे करत आढावा घेतल्यानंतर, त्यांनी सोमवारी (दि.१७) जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) मुख्यालयात विभागप्रमुख व गटविकास अधिकारी (Group Development Officer) यांची समन्वय सभा घेतली. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी नरेगा योजनेत अनेक तालुक्यांमध्ये समाधानकारक काम नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे नरेगा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पावसाचे पाणी (rain water) आडविण्यासाठी बंधारे, शेततळे उभारण्यास प्राधान्य द्यावे. जिल्हाभरात १०० मॉडेल स्कूल उभारले जाणार आहे. त्याअनुषंगाने शाळांना संरक्षण भिंत उभारणे, शौचालये तयार करणे ही कामे करायची आहे. त्याचे नियोजन करा, असेही त्यांनी सांगितेल. पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी प्रत्येक तालुक्यात अभ्यासिका उभारण्याचे निर्देश दिले आहेत.

त्याअनुषगांने प्रत्येक तालुक्यात अभ्यासिका उभारण्यासाठी लागणारे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सभेस अतिरिक्त मुख्य कार्य्कारी अधिकारी अर्जुन गुंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, दीपक चाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज, संजय नारखडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात गुरूवारी फवारणी

जिल्हयात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे.मात्र,या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावा-गावांतीळ गोठयांमध्ये, जनावरांच्या ठिकाणी फवारणी, धुरीकरण केले जात आहे. मात्र, एकाच वेळी जिल्हयातील सर्वच गावांमध्ये ही फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून गुरूवारी (दि.२०) जिल्हाभरात ही फवारणी करावी असे आदेश आशिमा मित्तल यांनी यावेळी दिले.

आज- उद्या स्वच्छता मोहीम

जिल्हा परिषदेतर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१८) व बुधवारी (दि.१९) असे दोन दिवस जि.प. मुख्यालयातसह जिल्हाभरातील सर्व पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. यात कार्यालयांची स्वच्छता, अडगळीतील सामान काढणे, रद्दी कमी करणे आदी कामे केली जाणार आहेत.हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन मित्तल यांनी यावेळी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या