Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआश्वासन दिले, पण दगड आहे कुठे?

आश्वासन दिले, पण दगड आहे कुठे?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गत नऊ महिन्यांपासून प्रलंबीत असलेल्या निळकंठेश्वर मंदिराच्या पायर्‍ंयांचे काम ( The work of the steps of Nilakanteshwar temple)15 दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन स्मार्ट सिटीने ( Smart City Company)दिले असले तरी अद्याप पायरीच्या दगडांचा तपास नसल्याने या ठिकाणी वापरल्या जाणार्‍या दगडाच्या गुणवत्तेवरुन गोदाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी 11 वाजता गोदाघाटावर संयुक्त पहाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

गोदा प्रेमी सेवक समितीसोबत स्मार्टसिटी अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीला स्मार्टसिटीच्या वतीने सुमंत मोरे, मनपा उपायुक्त विजयकुमार मुडे तर गोदा प्रेमी सेवक समितीच्या वतीने देवांग जानी, महंत सुधीरदासजी पुजारी, मामा राजवाडे, धनंजय पुरी, रामसिंग बावरी, कैलास देशमुख, बाबासाहेब राजवाडे, बबलू परदेशी, नरेंद्र दारणे, चिराग गुप्ता आदी उपस्थित होते.

निळकंठेश्वर मंदिराच्या पायर्‍यांच्या कामाला 9 महिन्यांचा खंड पडलेला आहे. या कामाला 15 दिवसांत गती देण्याचे आश्वासन स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी दिले. यावेळी गोदा प्रेमींनी याठिकाणी वापरण्यात येणार्‍या दगडाला विरोध केला. राजस्थानचा दगड न वापरता टेंडरमध्ये नमुद बेसॉल्ट दगडाचा वापर करण्यात यावा किंवा नेवासा येथून दगड मागवण्याचा सल्ला दिला.नदी पात्र कोरडे करून जुना वाहून गेलेला दगड पुन्हा मिळवणे शक्य असल्याचा सूर यावेळी उमटला.

नागरिकांच्या भावना व आस्थांशी निगडीत (पान 10 वर) असलेल्मा गोदावरीतील 17 विविध कुंडांच्मा जलप्रवाहाला पुनरुज्जीवित करण्मासोबतच पावणे तीन वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या देवीच्या सांडव्याची पुनर्स्थापना करावी मा मागणीवर गोदा प्रेमी सेवक समितीद्वारे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.त्या स्थानाची देखिल प्रत्यक्ष पहाणी दौऱ्यात करण्यात येणार आहे. खोदकामात सापडलेल्या पुरातन कासवाची पुनर्स्थापना करावी, नदी काठावरील शौचालय तोडून त्याठिकाणी बायलॉजिकल शौचालय उभारण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या