Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यादीडशे सिमेंट बंधारे पूर्णत्वाच्या मार्गावर

दीडशे सिमेंट बंधारे पूर्णत्वाच्या मार्गावर

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ङ्गमिशन भगीरथफ उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेतून 15 तालुक्यांत सिमेंट बंधार्‍यांची 31 कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेतून 30 जूनपर्यंत जवळपास 150 सिमेंट बंधारे पूर्ण होणार आहेत.

- Advertisement -

आदिवासी भागात रोजगार हमी योजनेतून जलसंधारण सुविधा उभारण्यासाठी ‘मिशन भगिरथ’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जलसंधारण विभागाने सर्व तालुक्यांत सर्वेक्षण करून नाल्यांवर बंधारे बांधण्यासाठी ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यात सुरगाणा, पेठ, बागलाण, दिंडेारी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव नाशिक, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांमधील 156 गावे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक गावात 5 ते 6 बंधारे बांधण्यात येणार आहेत. यात 5 ते 30 लाख रुपयांच्या मर्यादेत गरजेनुसार बंधार्‍यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांचा ग्रामपंचायत विभागाकडून रोजगार हमी योजना आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. मार्चपासून कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

‘मिशन भगीरथ’ अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून 15 तालुक्यांत जलसंधारणाची 625 कामे प्रस्तावित आहेत. ही कामे जवळपास 110 कोटी रुपयांची आहेत. पहिल्या टप्प्यात 15 तालुक्यांतील 156 गावांमध्ये 5 ते 30 लाख रुपयांदरम्यान सिमेंट बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. सुरगाणा तालुक्यातील सर्वाधिक 113 कामे या योजनेतून प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यापैकी 11 कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर कामांपैकी एक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होतील, असेअधिकार्‍यांकडून सांंगण्यात येत आहे. रोजगार हमी योजनेतून बंधारे बांधण्यासाठी 90 टक्के काम यंत्राने व 10 टक्के काम मजुरांकडून करून घेण्याची परवानगी आहे.

जिल्ह्यासाठी 60:40 प्रमाण राखत जिल्हा परिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे. सुरगाणा तालुक्यातून बाहेरच्या भागात रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. यामुळे जलसंधारण विभागाने सुरगाण्यात अधिक कामे प्रस्तावित आहेत. मात्र सिमेंट बंधार्‍यांची 10 टक्के कामे मजुरांकडून करून घ्यायची आहेत.

तालुकानिहाय पूर्ण कामे

तालुका पूर्ण कामे

बागलाण 5

चांदवड 3

देवळा 5

दिडोरी 1

इगतपुरी 2

कळवण 0

मालेगाव 4

नांदगाव 5

नाशिक 0

निफाड 0

पेठ 2

सिन्नर 0

सुरगाणा 1

त्रिंबक 3

येवला 0

जिल्हा टँकरमुक्तीचा संकल्प

दरवर्षींचा दुष्काळ, टँकरने पाणीपुरवठा हे दुष्काळी गावातील दरवर्षीचे चित्र पालटण्यासाठी नाशिक जिल्हा टँकरमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. येत्या पावसाळ्यात येथे साठणारे पाणी ‘भगीरथ मिशन’ किती यशस्वी झाले ते सिध्द करणार आहे.

डॉ. अर्जुन गुंडे, अतिीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या