
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिका निवडणुकीतील (NMC Election) महिला आरक्षणाची सोडत आज मुंबई नाका येथील महापालिकेच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात होत आहे...
मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी महिला आरक्षण सोडत संदर्भात रूपरेषा सांगितली. त्यानंतर महिलांसाठी राखीव पहिली चिठी अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक 12 अ निघाली. या पाठोपाठ १४ अ, २६ अ, ४१ अ, ४३ अ, ३५ अ, ३४ अ, ४४ अ, २२ अ, आणि २७ अ अशा एकूण 10 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.