मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'असे' आहे महिला आरक्षण

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'असे' आहे महिला आरक्षण

मुंबई । Mumbai

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Election) निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या आदेशानुसार वांद्रे (Bandra) येथील रंगशारदा सभागृहात (Rangsharda Hall) आज (दि ३१) आरक्षण (reservation) सोडत जाहीर करण्यात आली...

ओबीसी आरक्षण (OBC reservation) वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत निघाली असून यात मात्तबर नगरसेवकांचे प्रभाग राखीव झाले आहेत. तर काही राखीव प्रभाग खुले झाले आहेत.

यामध्ये मुंबईच्या माजी महापौर (mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) व राष्ट्रवादीच्या (NCP) माजी गटनेत्या राखी जाधव (Rakhi Jadhav) यांना दिलासा मिळाला आहे. यात पेडणेकर यांचा प्रभाग क्रमांक २०६ हा सर्वसाधारण झाला आहे. तर जाधव यांचा प्रभाग क्रमांक १३० महिलांसाठी राखीव झाला आहे.

दुसरीकडे शिवसेना (shivsena) उपनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष (Standing Committee Chairman) यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांना या सोडतीत धक्का बसला असून त्यांचा प्रभाग क्रमांक २१७ हा सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाला आहे.

तसेच माजी महापौर (mayor) विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांचा प्रभाग क्रमांक ९६ हा महिलांसाठी राखीव झाला आहे. तर काँग्रेसचे (Congress) माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) भाजपचे (BJP) माजी गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आता दुसऱ्या प्रभागांतून निवडणुकीची संधी शोधावी लागणार आहे.

अनुसूचित जाती महिला प्रवर्ग आरक्षण - प्रभाग क्र. १३९, १९०, १९४, १६५, १०७, ८५, ११९, २०४

अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग आरक्षण प्रभाग क्र. १२४

महिला सर्वसाधारण आरक्षण सोडत, ४४, १०२, ७९, ११, ५०, १५४, १५५, ७५, १६०, ८१, ८८, १३७, २१७, १३०, २३२, ५३

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com