संतापजनक! भर रस्त्यात पेट्रोल टाकून महिलेला पेटवलं

संतापजनक! भर रस्त्यात पेट्रोल टाकून महिलेला पेटवलं

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूवी मुंबईतील (Mumbai) मीरारोड (Mira Road) येथे लिव्ह इन पार्टनरने आपल्या प्रेयसीची हत्या (Murder) करुन तिच्या मृतदेहाचे (Dead Body) तुकडे मिक्सरमध्ये बारीक करत कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खायला घातल्याची घटना उघडकीस आली होती. अशातच आता ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा मुंबईतील चेंबूर परिसरात भर रस्त्यात महिलेच्या अंगावर पेट्रोल (Petrol)ओतून तिला जिवंत पेटवण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे....

संतापजनक! भर रस्त्यात पेट्रोल टाकून महिलेला पेटवलं
Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर; आता 'या' तारखेनंतर कोसळण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला (women) नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी बसची (Bus) वाट पाहत उभी होती. त्यावेळी तिचा पती संजय ठाकूर (३७) हा त्याठिकाणी आला व तिच्या अंगावर पेट्रोल ओतले. त्यानंतर सिगारेटच्या लाईटरने (lighter) तिला पेटवले आणि तिथून पळ काढला. यानंतर त्या परिसरातून जाणाऱ्या मोहम्मद इस्माईल शेख या रिक्षाचालकाने पीडीत महिलेला जळताना पाहिले.

संतापजनक! भर रस्त्यात पेट्रोल टाकून महिलेला पेटवलं
Nashik Accident News : ट्रेलरखाली दबून दुचाकीवरील मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

त्यानंतर रिक्षाचालकाने पीडितेवर पाणी (Water) ओतून आग (Fire) विझवली आणि प्रवाशांच्या मदतीने तिला सायन रुग्णालयात (Sion Hospital) उपचारासाठी दाखल केले. या आगीत पीडित महिला दहा टक्के भाजली असून रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तिचे प्राण वाचले आहेत.

संतापजनक! भर रस्त्यात पेट्रोल टाकून महिलेला पेटवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत संशयिताने केला आत्महत्येचा प्रयत्न

दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना (Police) दिल्यानंतर आरोपी पतीविरोधात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी पतीला अटक (Arrested) केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

चारित्र्यावर घेत होता संशय

मागील काही महिन्यांपासून आरोपी पती दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. पत्नीचे बाहेर इतर पुरुषाबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याने ती आपल्याकडे परत येत नाही, असा आरोप तो करत होता. इतकेच नाही तर तो पत्नी रहात असलेल्या बहिणीच्या घरी जाऊन तिला त्रास देखील देत होता. त्यामुळे सरिताने दोनदा पोलीसात तक्रार सुद्धा दाखल केली होती, अशी माहिती पीडितेच्या भावाने दिली.

संतापजनक! भर रस्त्यात पेट्रोल टाकून महिलेला पेटवलं
Rain Alert : मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com