Friday, April 26, 2024
Homeजळगावधक्कादायक : शेंदुर्णीत भाजपा नगरसेवकाकडून महिलेवर अतिप्रसंग

धक्कादायक : शेंदुर्णीत भाजपा नगरसेवकाकडून महिलेवर अतिप्रसंग

शेंदुर्णी Shendurnee ता जामनेर

येथिल भाजपा नगरसेवक (BJP corporator) शरद बारी याने महेश नगरातील एका महेलेच्या (woman) घरात घुसुन धमकावत तिच्यावर अतीप्रसंग (assaulted) केल्याने बलात्काराचा गुन्हा (Crime of Rape) दाखल झाला आहे. महिलेने आरडा ओरड करताच नागरीकांनी महिलेची सुटका करत नगरसेवकाची बेदम धुलाई केली असल्याने उपचार सुरु आहे.

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे कि, महेश नगरात कुटुंबासह वास्तव्यास रहाणार्या मुस्लीम समाज्याच्या महिलेच्या घरात पती घरी नसल्याचे पाहून जबरदस्तीने घुसुन धमकावत तीच्यावर अतीप्रसंग केला. महिलेने विरोध केला असता तीला धमकाविण्यात आले सदर प्रकाराबाबत आसपासच्या नागरीकांना याची कुणकुण लागताच. नागरीकांनी घरात घुसुन महिलेची सुटका करत सदर नगरसेवकाची बेदम धुलाई केली. पोलीसांना पाचारण करून स्वाधीन करण्यात आले.

सदर घटनेच्या गुन्ह्याची नोंद पहुर पोलीस स्टेशनमध्ये गुर. क्र. १७२ /२३ नुसार भादवी कलम ३७६ , ४४८ , ४५२ , ५०६ प्रमाणे धमकावणे आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असून सदर नगर सेवकावर पाचोरा येथे पोलीसांच्या देखरेखीत उपचार सुरु असुन वैद्यकीय सल्या नुसार अटकेची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी सांगितले.

सदर घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. तसेच , एक दिड महिन्यांपूर्वी भाजपाच्या उपनगराध्यक्षाला विनयभंग प्रकरणी जामनेर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दीन्ही घटना बघता नागरीकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु असुन संताप व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या