नाशिक बस दुर्घटना : महिलेने सांगितली आपबिती; पाहा व्हिडीओ

नाशिक | Nashik

शहरातील नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील (Nashik-Aurangabad Road) मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ आज पहाटे एका खासगी बसला अचानक आग लागल्याने मोठी दुर्दैवी घटना घडली. या घटनेत बस (Bus) संपूर्णपणे जळून खाक झाली असून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे...

आयशर ट्रक आणि बसमध्ये हा भीषण अपघात घडला. त्यानंतर बसला अचानक आग लागली. या बसमध्ये सुमारे ४० ते ५० प्रवासी होते. चितांमणी ट्रॅव्हल्सची (Chitamani Travels) ही बस यवतमाळ ते मुंबई जात होती. त्यानंतर आता या अपघातात (Accident) बचावलेल्या एका महिलेने घडलेल्या घटनेसंदर्भात आपबिती सांगितली आहे.

पूजा गायकवाड असे या महिलेचे नाव असून त्या म्हणाल्या की आम्ही झोपेत असतांना बसने अचानक पेट घेतला. त्यावेळी घटनास्थळी आलेल्या नागरिकांनी बसच्या खिडकीमधून माझ्यासह आणखी तीन जणांना बाहेर काढले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com