अनेक वर्षानंतर नाशिक शहरात पहिल्यांदाच 'महिलांसाठी विशेष बस'; असे असतील मार्ग

अनेक वर्षानंतर नाशिक शहरात पहिल्यांदाच 'महिलांसाठी विशेष बस'; असे असतील मार्ग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात पहिल्यांदाच महिलांसाठी विशेष बस (Woman Special Bus Service) रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. नाशिक महापालिकेच्या वतीने सिटीलिंकने (Citi linc) उद्या (दि २६) पासून विविध मार्गांवर पहिल्यांदाच महिलांसाठी स्पेशल बसेस सुरु केल्या आहेत....

अधिक माहिती अशी की, नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थातच सिटीलिंकने आता खास महिलावर्गासाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून एकुण तीन मार्गांवर ८ फेऱ्यांच्या माध्यमातून या महिला विशेष बस धावणार आहेत.

याआधी वसंत गीते, अमृता पवार आणि एसटीचे अधिकारी कैलास देशमुख यांच्या कार्यकाळात दोन बसेस महिलांसाठी सुरु करण्यात आल्या होत्या. कालांतराने या बसेस रिकाम्या जाऊ लागल्यामुळे सर्वांनाच परवानगी देण्यात आली. तेव्हापासून शहरातून महिलांसाठी विशेष बससेवा काही सुरु करण्यात आलेली नव्हती.

गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी विशेष बससेवा सुरु झाल्यामुळे महिला वर्गात समाधानाचे वातावरण आहे. वरील एकूण तीन मार्गावर ८ फेऱ्यांच्या माध्यमातून धावणाऱ्या या महिला विशेष बस सेवेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.

असे आहेत मार्ग मार्ग क्रमांक १०१

फेरी क्रमांक १)

गंगापूर गाव ते निमाणीमार्गे बारदान फाटा (मार्ग : सातपूर - सिव्हिल निमाणी) सकाळी | सकाळी ९.३० वाजता

फेरी क्रमांक २)

निमाणी ते गंगापूर गाव मार्गे सिव्हिल सातपूर, बारदान फाटा, गंगापूर गाव १८.०० वाजता.

मार्ग क्रमांक १०३

फेरी क्रमांक १) अंबडगाव से निमाणी मार्गे सिम्बाइसिस, उत्तमनगर, पवननगर, निमाणी सकाळी ९.:

फेरी क्रमांक २) निमाणी ते अंबडगाव मार्गे पवननगर, उत्तमनगर, ९.२५ वाजता... तर सिम्बॉइसिस, अंबडगाव १८.०० वाजता

मार्ग क्रमांक २६६

फेरी क्रमांक १) नाशिकरोड ते निमाणी मागे व्दारका, शालिमार, सिबीएस, निमाणी

सकाळी ९.३० वाजता तर फेरी क्रमांक

२) निमाणी ते नाशिकरोड मार्गे सिबीएस, शालिमार, न्दारका, नाशिकरोड सकाळी ९.३० वाजता, फेरी क्रमांक

३) नाशिकरोड ते निमाणी मार्गे व्दारका, शालिगार, सिबीएस, निमाणी १८.०० वाजता तर फेरी क्रमांक

४) निमाणी ते नाशिकरोड मार्गे सिबीएस, शालिमार, व्दारका, नाशिकरोड १८.०० वाजता महिला विशेष बस धावेल.

Related Stories

No stories found.