Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याभद्रकालीच्या महिला एपीआय लाच स्विकारताना जाळ्यात; दोन दिवसात दोन लाचखोर पकडले

भद्रकालीच्या महिला एपीआय लाच स्विकारताना जाळ्यात; दोन दिवसात दोन लाचखोर पकडले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भद्रकाली पोलीस ठाण्याच्या (Bhadrakali Police Station) सहायक पोलीस निरीक्षक प्रणिता दीपक पवार (API Pranita pawar) यांना २० हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Anti corruption bureau) यश आले आहे…

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार यांनी तक्रारदार यांच्याविरोधात दाखल असलेल्या ३७६ सह इतर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तसेच कोर्टात चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी १३ मे २०२२ रोजी केली होती.

यानंतर तक्रारदाराने लाचलुचपतप्रतिबंधक विभागाला याबाबतची तक्रार केली. दरम्यान, आज दिनांक १८ मे रोजी लाचेची रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे व सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी वैशाली पाटील, राजेंद्र गीते, शरद हेम्बाडे, अजय गरुड, प्रकाश महाजन चालक परशुराम जाधव यांनी सापळा यशस्वी करत लाचखोर महिला पोलीस अधिकाऱ्यास गजाआड केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या