पुराच्या पाण्यात महिला बेपत्ता

पुराच्या पाण्यात महिला बेपत्ता

सटाणा | प्रतिनिधी Satana

बागलाण आदिवासी पश्चिम पट्ट्यातील पायरपाडा ( Payarpada ) येथे आज रविवारी दुपारी दीड वर्षाच्या सुमारास ढग फुटी मुसळधार पाऊस ( Heavy Rain )झाल्याने नदी नाल्यांना पूर आला या पुरामध्ये पायरपाडा येथील शेतकरी महिला रंजना महाजन ( Ranjana Mahajan )नदीच्या पुरामध्ये वाहून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .

घटनास्थळी आमदार दिलीप बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी सह पोलिसांचा फौजफाटा फाटा उपस्थित होता महिलेचा शोध सुरू होता मात्र रात्र झाल्याने शोध कार्यास अडथळा येत असल्याने शोध कार्य थांबवण्यात आलं रंजना महाजन ही आदिवासी महिला पूर पाण्यामध्ये वाहून गेल्याने परिसरातील पायरपाडा मोठे महादर बंदारपाडा, सावरपाडा या गावातील तरुणांनी नदीत उतरून शोध घेतला अखेर कुठे च सापडलेली नसल्याने उद्या सकाळी सहा वाजेपासून परत शोध मोहीम करण्यात येईल अशी माहिती जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी दिली

पायरपाडा ता बागलाण येथील आदिवासी शेतकरी महिला रंजना महाजन हे काल रविवार रोजी आपल्या शेतामध्ये शेती काम करण्यासाठी गेलेली होती त्यावेळी पावसाचं वातावरण असल्याने शेती काम आपटून शेतातून घराकडे येत असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला त्यावेळी पावसाचं रुद्र रूप असल्याने डोंगर नाल्यातून पाणी नाल्यांमध्ये होऊ लागला .

आराम नदी उगमच्या नाल्यांमधून पाणी वाहत होतं तेव्हा रंजना महाजन ही शेतकरी महिला नाला ओलांडाताना त्या नालाच्या पुरामध्ये नदीत वाहून गेली तिच्यासोबत असलेले शेळीही पाण्यामध्ये वाहून गेली सदरची घटना वाऱ्यासारखी परिसरात कळतात घटनास्थळी आदिवासी ग्रामस्थांनी धाव घेतली मात्र नदींना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे शोध कार्य करता येत नव्हतं पाणी उघडल्यानंतर नदीमध्ये शोध घेतला गेला मात्र रंजना महाजन यांचा शोध लागला नाही घटनेची माहिती बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना कळतात घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ पोलीस हवालदार गोपीनाथ भोये तुकाराम जगताप दीपक भगत परदेशी पोलीस नाईक शरद भगरे पोलीस कॉन्स्टेबल पृथ्वीराज बारगळ भूषण पगारे पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला यावेळी पोलिसांनी स्थानिक तरुणा ंच्या मदतीने तपास कार्य केलं मात्र रात्र झाल्यामुळे तपास करायला अडचण निर्माण झाली त्यामुळे पुढील तपास उद्या सोमवार रोजी सकाळी सहा वाजेपासून करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी दिली

पायरपाडा येथील आदिवासी शेतकरी महिला रंजना महाजन ही शेती काम आपटून शेतातून घराकडे येत असताना नदीच्या पुरामध्ये ती वाहून गेली शोध कार्य सुरू केलं मात्र अद्याप सदर महिला सापडलेली नाही तिचा शोध घेण्यासाठी सोमवार रोजी पूर्ण प्रयत्न करून तिचा शोध घेऊ अशी माहिती जायखेडा पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीकृष्ण पारधी यांनी दिली

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com