Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याडंपर आणि दुचाकीच्या अपघातात महिलेचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

डंपर आणि दुचाकीच्या अपघातात महिलेचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव जवळील चाळीसगाव -संभाजी नगर रोडवरील म्हसोबा बारी येथे दुचाकी आणि हायवा (डंपर) यांच्या मध्ये झालेल्या अपघातात एक महिला ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नांदगाव हुन तळवाडे दुचाकीने क्रमांक एम.एच.20 ए.पी. 4580 जात असताना म्हसोबा बारी हायवा(डंपर ) क्रमांक एम.एच.12क्यू. जी.0218 हा भरघाव वेगाने बेदरकार वाहन चालवून जोरदार धडक दिल्याने मंगल सतिष मगर (३६) रा.तळवाडे ता.वैजापूर जि.संभाजीनगर ही महिला गंभीर जखमी झाल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.तर मंगल यांचे पती सतिष मगर व दोन मुले प्रणव व प्रजल हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

याप्रकरणी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.राजु मोरे अधिक तपास करीत असून हायवा चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या