Friday, May 10, 2024
Homeजळगावजामनेरातील गुन्ह्याची लासलगावला तोडीपाणी !

जामनेरातील गुन्ह्याची लासलगावला तोडीपाणी !

जामनेर/नाशिक – प्रतिनिधी :

जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी आपल्या चुलत भावाच्या मुलासाठी श्रीरामपूर येथील मुलगी विवाह करून आणली.

- Advertisement -

मात्र महिनाभरात ही मुलगी आई सोबत निघून गेली होती. याबाबत पारस ललवाणी यांनी सदर मुलीच्या आई विरुद्ध 420 चा गुन्हा दाखल केला होता.

सदर महिलेने सुद्धा पारस ललवाणी यांचे विरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा मागे घेण्यासाठी सदर महिलेने पारस ललवाणी यांच्याकडे 25 लाख खंडणीची मागणी केली होती.

आज ही रक्कम लासलगाव येथे सदर महिलेला देण्याचे ठरले होते. रक्कम देण्याआधी पारस ललवाणी यांनी पोलिसांमार्फत सापळा रचून सदर महिलेला 25 लाखांपैकी 50 हजार रुपये घेताना लासलगाव पोलिसांनी रंगेहात पकडले.

सदर महिलेविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेसोबत जामनेर येथील प्रफुल्ल लोढा व सदर मुलीचा मानलेला मामा संदीप कोचर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर महिलेला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी त्यांच्या चुलत भावाच्या मुलांसाठी श्रीरामपूर येथील चंदुलाल कोठारी यांच्या मुलीशी 9 डिसेंबर 2020 रोजी विवाह करुन सदर मुलीला जामनेर येथे घरी आणले.

मात्र ती मुलगी महिनाभराच्या आतच आपल्या आई सोबत माहेरी पळून गेली. सदर मुलीला आणण्यासाठी गेले असता तिच्या आईने तिला पाठविले नाही.

याबाबत पारस ललवाणी यांनी 11 जानेवारी 2021 रोजी सदर मुलींच्या आई विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.

यानंतर मुलीची आई ज्योती चंदुलाल कोठारी हीनेही पारस ललवाणी यांचे विरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला 2 मार्च 2021 रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याच्या अंतर्गत पारस ललवाणी यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हा मध्ये मुलीच्या आईने पारस ललवाणी यांच्यावर आरोप ठेवले होते की माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी व मुलीचा मानलेला मामा सुनील कोचर व मुलीचा सावत्र बाप चंदुलाल कोठारी या तिघांनी संगनमताने माझी मुलगी तेरा वर्षांची अल्पवयीन असताना मला व माझ्या मुलीला विश्वासात न घेता माझ्या मुलीचे लग्न परस्पर ठरविले.

मुलगी अल्पवयीन आहे म्हणून तिचे लग्न मला सध्या करायचे नाही असे सांगून मी लग्नाला विरोध केला असता पारस ललवाणी यांनी मला मारहाण केली. मुलीच्या डोक्याला पिस्तूल लावून तिला लग्नासाठी धमकावले.

माझ्या मुलीचे खोटे आधार कार्ड, खोटा शाळेचा दाखला तयार करून मुलगी तेरा वर्षांची असताना तिचे वय वाढवून आणले. पारस ललवाणी यांनी मुलीचा सावत्र बाप चंदुलाल कोठारी व सुनील कोचर यांना सात लाख रुपये देऊन मुलगी खरेदी करून घेतली व तिचे बळजबरीने लग्न लावले.

लग्नानंतर पारस ललवाणी याने माझ्या मुलीचा विनयभंग केला असाही आरोप मुलीच्या आईने गुन्ह्यामध्ये केला होता. तेव्हापासून या गुन्हा मध्ये पारस ललवाणी यांना जामीन मिळत नव्हता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी मुलीची आई ज्योतीबाई चंदुलाल कोठारी हिने एजंट मार्फत तीस लाखाची मागणी केली होती.

मात्र यामध्ये दोघे बाजूच्या एजंटांमार्फत महिलेला 25 लाख रुपये देण्याचे ठरले. दोघा बाजूंच्या एजंटांमार्फत ही रक्कम लासलगाव येथील ऐश्वर्या लॉजमध्ये देण्याचे ठरले. मात्र या आधीच पारस ललवाणी यांनी पोलिसांकडउे तक्रार केली होती.

बुधवारी (दि.28) दुपारी लासलगावचे सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी ऐश्वर्या लॉज येथे धाड टाकत खंडणी मागितलेल्या रकमेपैकी सुमारे 50 हजार रुपयांचा ऐवज घेताना ज्योती कोठारी रा. श्रीरामपूर या महिलेला रंगेहात पकडत अटक केली. तिच्या विरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशनला गुर नंबर 403/ 2021 भादवि कलम 384, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहआरोपी म्हणून जामनेरचे प्रफुल्ल लोढा व मुलीचा मानलेला मामा सुनील कोचर यांनाही आरोपी करण्यात आले आहे. सदर महिला लासलगाव पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठारे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या