Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याव्हॉट्सअ‍ॅपला केंद्राची तंबी, म्हणाले...

व्हॉट्सअ‍ॅपला केंद्राची तंबी, म्हणाले…

नवी दिल्ली

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन धोरणासंदर्भात (Policy) सुरू असलेल्या वादात आता केंद्र सरकारने उडी घेतली आहे. सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला तंबी देत आपल्या धोरणात (Policy) केलेला बदल करण्यास सांगितले.

- Advertisement -

केंद्र सरकारने व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलसीबाबत व्हॉट्सअ‍ॅपचे सीईओ विल कॅथकार्ट यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले की, जगाच्या तुलनेत व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात सर्वाधिक युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवा अटी आणि गोपनीयता धोरणात प्रस्तावित केलेल्या बदलामुळे भारतीय नागरिकांच्या निवडी आणि स्वायत्ततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या बदलांना परत घ्यावे. भारतीय युजर्सचा योग्य सन्मान व्हायला हवा. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवा अटी आणि धोरणात एकतर्फी बदल योग्य नाही आणि तो स्वीकारला जाणार नाही.

काय आहे नवीन धोरण?

व्हॉट्सअ‍ॅप यूजर जे कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड किंवा रिसीव्ह करतात, कंपनी त्याचा वापर कुठेही करू शकणार. कंपनी त्या डाटाला कुठेही शेअर करू शकेल. ही पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होणार होती. पण, वाद वाढल्यानंतर डेडलाइनला वाढवून 15 मे करण्यात आले. आधी दावा करण्यात आला होता की, युझरने या पॉलिसीला अ‍ॅग्री न केल्यास व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार. पण, नंतर याला ऑप्शनल सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या