Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedनाशिकमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरवात

नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरवात

नाशिक |

विजांच्या कडकडाटांसह नाशिकमध्ये बुधवारी दुपारी १.४५ वाजता पावसाला सुरुवात झाली. यामुळे सकाळपासून घामामुळे लाहीलाही होणाऱ्या नाशिककरांना दिलासा मिळाला.

- Advertisement -

हवामान विभागाने राज्यात चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. विजांच्या कडकाडाटांसह सुरु झालेल्या या पावसामुळे दुपारीच संध्याकाळसारखे वातावरण झाले. दुपारी १.४५ वाजता पाऊस सुरु झाला. शहर व उपनगरीय परिसरात पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागांसह सिडको, सातपूर, आडगाव या ठिकाणी कोसळधार पहायला मिळाली. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ झाली. वाहनचालकांना वाहने थांबवून अडोशाच्या आधार घ्यावा लागला.

- Advertisment -

ताज्या बातम्या