हिवाळी अधिवेशनावर करोनाचे सावट

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यात ओमायक्रॉनचे Omicron रुग्ण वाढत असताना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या winter session of the legislature उर्वरित दोन दिवसांच्या कामकाजासाठी अनिवार्य असलेल्या करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीत भाजप आमदार समीर मेघे MLA Samir Meghe यांच्यासह 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे अधिवेशनावर करोनाचे सावट निर्माण झाले आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी गेल्या आठवड्यात विधानभवन प्रशासनाने तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यात 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या आठवड्यासाठी चाचण्या केल्या असून त्यात 32 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये काही पत्रकार, पोलीस आणि सरकारी सेवकांचा समावेश आहे. त्यामुळे अधिवेशनात चिंता वाढली आहे.

अधिवेशनासाठी विधानभवनाचे अधिकारी, सेवक, सुरक्षा अधिकारी, पोलीस, पत्रकार, मंत्रालय अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर विधान परिषद, विधानसभा सदस्य यांना करोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *