राज्य विधिमंडळाचे १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाचे १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन
Nagpur winter session

मुंबई | Mumbai

विधिमंडळाचे सन २०२२ चे हिवाळी अधिवेशन (Winter session) सोमवार (दि. १९) डिसेंबरपासून विधानभवन, नागपूर (Nagpur) येथे सुरु होणार असून १९ ते ३० डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला...

विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar)आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis)महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत अधिवेशन कालावधीत होणाऱ्या विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. तसेच या अधिवेशनात सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडणार असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष कार्यक्रम राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

दरम्यान, विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक दि. २८ डिसेंबर रोजी घेण्याचे निश्चीत करण्यात आले असून अधिवेशनात अंदाजे २१ विधेयके सभागृहात चर्चा आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com