सीमावादावरुन अजित पवारांचा प्रहार; मुख्यमंत्री म्हणाले...

सीमावादावरुन अजित पवारांचा प्रहार; मुख्यमंत्री म्हणाले...

मुंबई | Mumbai

नागपुरात (Nagpur) आजपासून महराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरु झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सत्तेनंतर राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) घेरण्यासाठी विरोधी पक्षाने पूर्ण तयारी केली असून हे हल्ले परतवून लावण्यासाठी सत्ताधारीही सज्ज झाले आहेत...

आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन (Maharashtra-Karnataka border issue) सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. पंरतु, मुख्यमंत्र्यांनी तितक्याच ताकदीने विरोधकांचे हल्ले परतावून लावले...

ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडलेला मुद्दा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण पहिल्यांदाच देशाच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणी हस्तेक्षप करत मध्यस्थी केली. मला वाटतं हे पहिल्यांदाच घडले आहे. त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) अस्मितेचा विषय असल्याने त्यांनी बैठक घेतली. आम्ही यावेळी ठोस भूमिका घेतली. आमच्या लोकांना, गाडयांना अडवले जात असल्याचे त्यांना सांगितले. यावर आमच्याकडूनही प्रतिक्रिया उमटवू शकतात असे आम्ही त्यांना म्हणालो, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, आतापर्यंतच्या इतिहासात सीमाप्रश्नी केंद्राने पहिल्यांदाच एवढी रोखठोक भूमिका घेतली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या रुपाने केंद्राने याप्रश्नी हस्तक्षेप केला आहे. कर्नाटक सरकारला योग्य भाषेत समज दिलीये. ते ट्विट मी केले नाहीत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी अमित शहा (Amit Shah) यांच्यासमोर सांगितले. ते ट्विट कुणी केले, त्याचा कोणत्या पक्षाशी संबंध आहे याची माहिती पोलिसांना कळाली आहे, असे सांगतांना बोम्मईंचे ते अकाऊंट फेक असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

तसेच सीमावासीयांसाठी भुजबळांनी मार खाल्ला आहे, त्यांच्यामुळे आम्हालाही मिळाला आहे. आम्ही जेल भोगले आहेत. त्यावेळी बोलणारे कुठे होते?, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. तर यावर विरोधक गदारोळ घालू लागल्यानंतर शिंदेंनी त्यांना ए शांत बसा रे असे म्हणत चांगलेच सुनावले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com