गुजरात टायटन्स आयपीएल-२०२२ चा विजेता

गुजरात टायटन्स आयपीएल-२०२२ चा विजेता

अहमदाबाद | वृत्तसंस्था ( Ahemdabad )

अहमदाबाद मधील नरेंद्र मोडी स्टेडियमवर आयपीएल-२०२२ ( IPL-2022) चा क्रिकेटचा अंतिम सामना आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या ( Gujrat Titans Vs Rajsthan Royals )खेळण्यात आला. यात गुजरातच्या संघाने बाजी मारून आयपीएल-२०२२ चा विजेता संघ झाला आहे.

राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाकडून सलामीला यशस्वी जयस्वाल व जोस बट्लर फलंदाजीस आले. यश दयालच्या गोलंदाजीवर रवी श्रीनिवासन साई किशोरने यशस्वी जयस्वालला झेलबाद करत राजस्थानच्या संघास पहिला धक्का दिला. यशस्वी जयस्वालने १६ चेंडूत २२ धावा केल्या.

हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर रवी श्रीनिवासन साई किशोरने संजू सॅॅमसनला झेल बाद केले. संजू सॅॅमसनने ११ चेंडूत १४ धावा केल्या. मोहम्मद शमीने देवदत्त पडीककल ला २ धावांवर झेल बाद केले. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर वृद्धिमान शहाने जोस बट्लरला झेल बाद केले. जोस बट्लरने ३५ चेंडूत ५ चौकार लगावत ३९ धावा केल्या. शिमराॅॅन हेटमायर ११ धावाकरत हार्दिक पंड्याकडून झेलबाद झाला. रवींद्रचंद्रन आश्विनला डेविड मिलरने ६ धावांवर झेल बाद केले. ट्रेंट बोल्ट ११ धावा करत राहुल तेवतीयाकडून झेल बाद झाला. 20 व्या षटका अखेर राजस्थानच्या संघाने ९ गडी बाद १३० धावा केल्या.

राजस्थानने दिलेल्या १३१ धावांचे आव्हान स्वीकारत गुजरातच्या संघाकडून प्रथम वृद्धिमान शहा व शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात आले. प्रसिद्ध कृष्णाने वृद्धिमान शहाला ५ धावांवर क्लीन बोल्ड करत सामन्याच्या दुसऱ्या षटकात गुजरातच्या संघाला पहिला धक्का दिला. रियान परागने मॅॅथ्यु वेडला ८ धावांवर झेल बाद केले. यशस्वी जयस्वालने हार्दिक पंड्याला झेल बाद केले. हार्दिक पंड्याने ३० चेंडूत ३४ धावा केल्या. शुभमन गिलने नाबाद ४५ धावा तर व डेविड मिलरने नाबाद ३२ धावा करत या जोडीने धडाकेबाज फलंदाजी केली. गुजरातच्या संघाने ७ गडी राखून व ११ चेंडू शिल्लक ठेऊन राजस्थानच्या संघावर विजय मिळवला. गुजरातचा संघ आयपीएल-२०२२ चा विजेता संघ ठरला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com