Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यावाईन विक्री धोरण योग्यच

वाईन विक्री धोरण योग्यच

पुणे । वृत्तसंस्था Pune

वाईन विक्री धोरण (Wine sales strategy) हे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या दृष्टीने योग्यच होते, पण काही कारणास्तव ते अंमलात आले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसानच होत आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघामार्फत येथे द्राक्ष परिषद ( Grapes Council )आयोजित करण्यात आली. त्यावेळी शरद पवार यांनी उपस्थित द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन केले. काळाच्या ओघात होणारे बदल स्वीकारणे गरजेचे आहे. देशात द्राक्ष उत्पादनाच्या तुलनेत केवळ 8 टक्के द्राक्षांची निर्यात होते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून वाईन विक्रीचे धोरण महत्वाचे ठरले असते, असे पवार म्हणाले. शेती व्यवसायात कृषी शास्त्रज्ञांचे मोठे योगदान राहिले आहे. द्राक्ष परिषदेत शेतकर्‍यांना विविध शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाचा उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीतच आहे. गेल्या दोन वर्षापासून द्राक्ष हंगाम सुरु होण्यापूर्वीच अवकाळी पावसाची अवकृपा होत राहिलेली आहे. त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. या प्रतिकूल परस्थितीमुळे अनेक शेतकर्‍यांनी बागाही मोडल्या आहेत. 8 टक्के द्राक्षांची निर्यात तर 92 टक्के द्राक्षे भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी होतात. ही स्थिती लक्षात घेता स्थानिक बाजारपेठ मजबूत कशी होईल? आर्थिक उलाढाल मोठी कशी होईल? याकडे लक्ष देण्याची गरज परिषदेत व्यक्त झाली.

प्रश्न सोडवण्यास प्रयत्नशील

शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे घटक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. शेतीचाही ते भाग आहेत. त्यांच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून शेती सुरु आहे. देशात जवळपास असे 5 हजार शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्यामुळे विज्ञान आणि शेतीचा समतोल राखला गेला. वाईन विक्रीचे धोरण गेल्या राज्य सरकारने आणले. हा उत्तम निर्णय होता, पण काही कारणास्तव तो अंमलात आला नाही. प्रश्न खूप आहेत. यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासनही पवार यांनी द्राक्ष उत्पादकांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या