सचिन पायलट
सचिन पायलट
मुख्य बातम्या

१९ आमदारांवर कारवाई न करण्याचे आदेश

सचिन पायलट गटाला दिलासा; आता प्रकरण सर्वेच्च न्यायालयात

jitendra zavar

jitendra zavar

जयपूर। Jaipur

राजस्थानातील सत्तासंघर्षात आता सचिन पायलट गटाला उच्च न्यायालयाकडून माेठा दिलासा मिळाला. विधानसभा अध्यक्ष आमदारांच्या अयाेग्यतेसंदर्भात काेणतीही कारवाई करु शकत नाही, असे राजस्थान उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. म्हणजेच अध्यक्ष सी.पी.जाेशी १९ आमदारांना अपात्र जाहीर करु शकत नाही. आता संपूर्ण प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात जाणार आहे. तेथे अध्यक्षांनी उच्च न्यालयाच्या निर्णयास आव्हान दिले आहे. सर्वाेच्च न्यायालयात त्यावर साेमवारी सुनावणी हाेणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशाेक गेहलाेत थाेड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार आहे.

अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष मागील आठवडाभरापासून बघायला मिळत असून, विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह १९ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीसीला पायलट समर्थक १९ आमदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com