Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशकोरोना लसी संदर्भातील त्या VIRAL दाव्यामागचे सत्य जाणून घ्या...

कोरोना लसी संदर्भातील त्या VIRAL दाव्यामागचे सत्य जाणून घ्या…

नवी दिल्ली

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी लसीकरण हेच मोठे शस्त्र आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लसीकरणाची प्रक्रियाही वेगाने करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान लसीकरणासंदर्भात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. दरम्यान WhatsApp आणि सोशल मीडियावर सध्या असा एक मेसेज व्हायरल होत आहे, त्यात वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते लुक माँतानिये (Luc Montagnier) यांचा संदर्भ दिला आहे आणि म्हटले की व्हॅक्सिन घेणाऱ्यांच्या जीवाला धोका आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारविरोधात WhatsApp न्यायालयात

या पोस्टमध्ये लुक माँतानिये यांच्या हवाल्याने म्हटले की कोरोना लस घेणाऱ्यांचा दोन वर्षांच्या आतमध्ये मृत्यू होईल. त्यानंतर सरकारी संस्था असणाऱ्या पीआयबीने (PIB) या दाव्याबाबत पडताळणी केली, त्यानंतर पीआयबीने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं आणि लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियातील पोस्टमध्ये ज्या लुक माँतानिये यांचे नाव वापरले आहे त्यांना एच.आय.व्ही. विषाणूच्या शोधाबद्दल २००८ साठीचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

लस घेणे पुर्णपणे सुरक्षित आहे. अशा चुकीच्या पोस्ट व्हायरल करु नका, असे पीआयबीने टि्वट करत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या