प्रभागरचना नव्याने होणार ?

सदस्य संख्या, मुदतीबाबत प्रशासन संभ्रमात
प्रभागरचना नव्याने होणार ?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या वतीने राज्यातील ज्या महापालिकांच्या ( NMC )मुदत संपून निवडणुका ( ELections ) होणार आहेत अशा सर्व महापालिका आयुक्तांना काढलेल्या आदेशात पुन्हा प्रभागरचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यामध्ये किती सदस्यीय प्रभाग करायचे, किती तारखेपर्यंत त्याला अंतिम स्वरूप द्यायचे याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने महापालिका प्रशासन संभ्रमात पडले आहे.

तसे पाहिले गेले तर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यातच होणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्यामुळे नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक राजवट सुरू झाली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे नाशिकमधील 122 नगरसेवकांवरून अकरा नगरसेवकांची वाढ करून 133 नगरसेवक म्हणजे त्रिसदस्यीय 43 व चार सदस्य एक याप्रमाणे एकूण 44 प्रभागांची रचना ( Ward Strcture ) तयार करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली.

त्याच्यावर हरकत घेऊन 6 मार्च रोजी अंतिम अहवाल आयोगाकडे सादर केला आहे. मात्र ओबीसी आरक्षणावरून वाद सुरूच असल्यामुळे जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नाही, असा दावा करण्यात येऊन शासनाने याबाबत विशेष आदेश पारित केला व निवडणूक घेण्याचे अधिकार आपल्याकडे घेतले. त्यानुसार राज्य शासनाने नुकत्याच महापालिकांच्या आयुक्तांना पुन्हा प्रभागरचना करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र सूचना स्पष्ट नसल्यामुळे प्रशासन संभ्रमात आहे.

आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

शासनाच्या आदेशाची प्रत महापालिका प्रशासनाला मिळाली आहे.याबाबत महापालिका आयुक्त त्याच्यावर लवकरच निर्णय घेणार आहते. प्रशासक म्हणून देखील रमेश पवार यांच्याकडे जबाबदारी असल्यामुळे नवीन रचना कशी करायची, ती त्रिसदस्यीय ठेवायची की द्विसदस्यीय करायची याबाबत संभ्रम आहे. यामुळे महापालिकेचे आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.